mla kendre and gutte in no mood of patch up | Sarkarnama

आमदार केंद्रे व रत्नाकर गुट्टे यांच्यातून विस्तवही जाईना

गणेश पांडे
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

परभणी : गंगाखेड विधानसभेच्या राजकारणात एकमेंकांचे पक्के वैरी असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे व रासपचे नेते डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा वाद आता न्यायालयात गेला आहे.

गुट्टेंनी आर्थिक घोटाळा केला असल्याचा आरोप आमदार केंद्रेंनी केला होता. त्या विरोधात गुट्टेंनी केंद्रेच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. आता गुट्टेवर कारवाई होत नाही तो पर्यत आपणही स्वस्थ बसणार नाही असे आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे यांनी जाहिर केले आहे.  

गंगाखेडचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे व  राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी 2014 सालची विधानसभा निवडणुक लढवली होती. ते एकमेंकाचे प्रतिस्पर्धी होते. यात डॉ. मधुसुदन केंद्रे हे विजयी झाले. तेव्हापासून या दोघामध्ये आडवा विस्तू देखील जात नाही. आमदार डॉ. केंद्रे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्या 22 बनवाट कंपन्याच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज उचलून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप जून महिन्यात एका पत्रकार परिषदेत केला होता.

यामुळे व्यथित झालेल्या रत्नाकर गुट्टे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आपल्या नावाने केवळ तीनच कंपन्या आहेत व त्यांच्यावर कोणते कर्ज आहे याची माहिती प्रसिद्धिमाध्यमांना दिली होती. आपली लोकप्रियता गंगाखेड विधानसभा मतदारसंघात वाढली असल्यानेच आमदार केंद्रे यांनी बिनबुडाचे आरोप करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. आता  गुट्टे यांनी त्याच प्रकरणात आमदार मधुसुदन केंद्रे यांच्यावर 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

यामुळे परत दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. या दाव्यानंतर आमदार मधुसुदन केंद्रे यांनी सोमवारी (17) पत्रकार परिषद घेतली. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पाच हजार तीनशे कोटीचा अस्तित्वात नसलेल्या कंपन्याच्या नावे कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा पुनरूच्चार केला. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. माझ्यावर अब्रु नुकसानीचा 50 कोटीचा काय 500 कोटीचा दावा दाखल केला तरी, मी डॉ. गुट्टे यांनी केलेल्या घोटाळ्या प्रकरणी कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे आव्हान केंद्रे यांनी दिले. या साऱ्या घडामोडींमुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या दोघांचा हा वाद वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. 

संबंधित लेख