25 वर्षे आमदारकी असलेल्या गावाला टँकरने पाणी द्यावे लागतेही खेदाची बाब: जयकुमार गोरे

25 वर्षे ज्या गावात आमदारकी होती त्या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो ही खेदाची बाब आहे. तालुक्याच्या दुष्काळावरून माझ्यावर अनेक टिपण्या केल्या त्याकडे मी लक्ष देत नाही.-जयकुमार गोरे
25 वर्षे  आमदारकी असलेल्या  गावाला टँकरने पाणी द्यावे लागतेही खेदाची बाब: जयकुमार गोरे

सातारा : "उपग्रहाद्वारे दुष्काळ  जाहीर करणाऱ्या या शासनकर्त्याना आता उपग्रहावर पाठविण्याची व्यवस्था केली पाहिजे. खटाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत 19 तारखेपर्यंत शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही," असा इशारा माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे. अधिवेशनात शासनाने ठोस भूमिका घेतली नाही तर वडूज तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असेही त्यानी स्पष्ट केले.

खटाव तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करावा आणि दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात या मागणीसाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली वडूज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 

आमदार गोरे म्हणाले, "खटाव तालुक्याच्या माथी लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी येथील जनतेने माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. याची जाणीव मला आहे. उपग्रहाद्वारे दुष्काळ  जाहीर करणाऱ्या या शासनकर्त्याना आता उपग्रहावर पाठविण्याची व्यवस्था केली पाहिजे. 25 वर्षे ज्या गावात आमदारकी होती त्या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो ही खेदाची बाब आहे. तालुक्याच्या दुष्काळावरून माझ्यावर अनेक टिपण्या केल्या त्याकडे मी लक्ष देत नाही. "

"उरमोडीचे पाणी 60 गावातून वाहत आहे, जोपर्यंत दुष्काळ आहे तोपर्यंत उरमोडीचे पाणी बंद होऊ देणार नाही. 16  गावात पाणी देण्यावरून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मायणी परिसरातील 16 गावात पाणी देण्यासाठी त्यांनी निधी आणला म्हणूंन त्यांचे अभिनंदन करतो. पण एक दोन फुटाच्या पाईप मधून पाणी आणून तलावाचा तळ तरी भरेल का, मग शेतीला पाणी कसे मिळेल. टेंभु चे पाणी या भागाला देण्याची भूमिका घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अधिवेशनानंतर शासनाने दुष्काळाबाबत ठोस भुमिका  घेतली नाही तर वडूज तहसील कार्यालयासमोर उपोषण करू", असेही त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार जयश्री आव्हाड यांना निवेदन देण्यात आले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com