शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा तोल गेला : बातमीदाराला माराहाण

शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा तोल गेला : बातमीदाराला माराहाण

अलिबाग : निवडणूक आयोगाचे प्राधिकार पत्र नसतानाही पोलीसांना दमदाटी करून मतमोजणी केंद्रात आमदार जयंत पाटील गेले. पोलीसांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत अलिबागच्या मीडीयाने पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने जयंत पाटील यांचा तोल गेला. त्यांनी रागाच्या भरात `लोकसत्ता`चे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांसह निवडणूक आयोगाकडे जयंत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 

रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा निकाल अंतिम टप्प्यात होता. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित होता. शेकापचे जयंत पाटील दुपारी सुनील तटकरे यांना अभिनंदन करण्यासाठी मतमोजणी केंद्राकडे आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे निवडणूक आयोगाचे प्राधिकार पत्र नसल्याने पोलिसांनी मतमोजणी केंद्रात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आ. जयंत पाटील यांनी दमदाटी करून मतमोजणी केंद्रात प्रवेश केला.

सर्वसामान्यांना वेगळा न्याय व आमदारांना वेगळा न्याय या पोलीसांच्या दुटप्पी भुमिकेमुळे अलिबागच्या मिडीयाने पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना जाब विचारला. त्यावेळी आ. जयंत पाटील व मिडीयामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. शाब्दीक वादही झाला. 

हा वाद एवढा विकोपाला गेला की, शेकापचे आमदार जयॆत पाटील यांचा तोल गेला. त्यांनी रागाच्याभरात लोकसत्ताचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्या कानाखाली मारून त्यांना धक्काबुक्की केली. त्यामळे संतप्त झालेल्या मिडीयाने पोलीसांसह निवडणूक आयोगाकडे जयंत पाटील यांच्या विरोधात तक्रार केली. एका बाजूला विजयाचा आनंद साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला याप्रकारामुळे मतमोजणीच्या प्रक्रीयेला गालबोट लागले. त्यामुळे काही वेळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com