mla jadhav cancels decision of separate maratha party | Sarkarnama

आमदार हर्षवर्धन जाधव यांचे एक पाऊल मागे; मराठ्यांचा पक्ष काढण्याचा निर्णय रद्द

जगदिश पानसरे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

औरंगाबाद :  कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठ्यांना आरक्षण मिळत नाही म्हणूनच स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याचा विचार मांडला होता. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून त्यांनी आपला हा निर्णय रद्द केला आहे.

येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत कायदा करून मराठा आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याचा आता आपला कुठालही विचार नसल्याचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले. 

हर्षवर्धन जाधव म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार कुठलाच निर्णय घेत नसल्यामुळे मराठ्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याची मागणी मी केली होती.

माझा पक्ष काढण्यामागचा हेतू हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे हाच होता. त्यामुळे जर आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार असेल तर मी देखील राजकीय पक्ष काढण्याचा विचार सोडून देईन असे स्पष्ट केले. 15 नोव्हेंबरपर्यंत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल. त्यानंतर विधीमंडळाचे अधिवेशन बोलवून 20 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा कायदा केला जाईल आणि हा प्रश्‍न निकाली निघेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
 
संबंधित लेख