mla imtiyaz jalil confident about mim result in miraj | Sarkarnama

मिरजेत औरंगाबाद, हैदराबादसारखेच वातावरण : आमदार जलील 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

मिरज (सांगली) : मिरजमध्ये औरंगाबाद, हैदराबादसारखेच वातावरण आहे. महापालिका निवडणुकीत एमआएम चांगले यश मिळवेल, असा दावा आमदार इम्तीयाज जलील यांनी केला. 

मिरज (सांगली) : मिरजमध्ये औरंगाबाद, हैदराबादसारखेच वातावरण आहे. महापालिका निवडणुकीत एमआएम चांगले यश मिळवेल, असा दावा आमदार इम्तीयाज जलील यांनी केला. 

मिरजमधील प्रचारसभेत बोलताना आमदार जलील म्हणाले, " मिरजेत पाय ठेवू देणार नाही म्हणणाऱ्यांनो ऐका आम्ही आलोच आहोत. आधी निवडणूक लढवू नये यासाठी प्रयत्न केले गेले. पुन्हा प्रचाराला येऊ नये यासाठी, पण, आम्ही लढायचं आणि जिंकायचं ठरवलं होतं. 3 तारखेला त्याचे परिणाम दिसतील. निकालानंतर अकबर ओवैसीही येतील. 70 वर्षांपासून आमचा आवाज दाबला जातोय. आता आम्ही बोलणार, तुम्हाला ऐकावे लागेल. एकदा साथ द्या. मिरजेत लढू नका, असं काहींनी सांगितलं. पण, येथे औरंगाबाद, हैदराबादसारखेच वातावरण आहे.'' 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख