MLA Harish Pimpale shocks BhaRiPa | Sarkarnama

आमदार हरिष पिंपळेंचे भारिप-बमसंला धक्कातंत्र 

श्रीकांत पाचकवडे 
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

अकोला : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता सत्ता स्थापनेच्या डाव रचण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बार्शिटाकळी पंचायत समितीचे सभापती भिमराव पावले यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत आमदार हरिष पिंपळे यांनी भारिप-बमसंला जोरदार धक्कातंत्र दिले आहे. 

अकोला : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता सत्ता स्थापनेच्या डाव रचण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बार्शिटाकळी पंचायत समितीचे सभापती भिमराव पावले यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत आमदार हरिष पिंपळे यांनी भारिप-बमसंला जोरदार धक्कातंत्र दिले आहे. 

लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा विजयाचा वारू सुसाट धावत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी पताका फडकविण्यासाठी भाजपचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकडे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी कंबर कसली आहे. 

सर्वसामान्य जनतेची कामे करीत तळागाळातील उपेक्षितांना न्याय देण्याचे कार्य अविरतपणे करणारे आमदार हरिष पिंपळे यांच्या नेत्रूत्वावर विश्वास ठेवत जनतेने मुर्तीजापुर नगरपालिका भाजपच्या ताब्यात दिली होती. या यशानंतर आमदार पिंपळे यांनी आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. 

जिल्हा परिषद व काही पंचायत समित्यावर भारिप-बमसंचे वर्चस्व आहे. मात्र भारिपच्या सत्तेला छेद देत सत्ता परिवर्तनासाठी आमदार पिंपळेंनी नवीन रणनिती आखत भारिप बमसंला धक्कातंत्र दिले आहे. त्याची सुरूवात बार्शिटाकळी पंचायत समितीचे सभापती भिमराव पावले यांच्या भाजप प्रवेशातुन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आज सभापती भिमराव पावले यांचा भाजप कार्यालयात पालकमंत्री डॉं. रणजित पाटील, आमदार हरिष पिंपळे, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, तालुकाध्यक्ष अविनाश महल्ले, जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने, गणेश महल्ले, सुनिल थोरात, संजय चौधरी, गजानन मडगे, रामेश्वर नावकार, श्रीक्रूष्ण ढोरे, गणेश झडगे, हिरामन लोखंडे, संतोष कपीले, राहुल केदार आदींच्या उपस्थितीत प्रवेश झाला. 

विशेष म्हणजे बार्शिटाकळी पंचायत समितीच्या 12 सदस्यांमध्ये भाजपचा एकमेव सदस्य आहे. तर सत्ताधारी भारिप-बमसंचे 6, शिवसेना 3, कॉंग्रेसचे 2 आहेत. मात्र आमदार हरिष पिंपळे यांनी भारिप बमसंच्या थेट सभापतीलाच भाजपमध्ये खेचत जोरदार धक्का दिला आहे. 

ही परिवर्तनाची सुरूवात : खासदार धोत्रे 
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ताधारी भारिप-बमसं सर्वसामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ग्रामीन जनतेत तीव्र नाराजी आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जनता विकासाच्या मुद्यावर परिवर्तन घडवुन आणत भाजपच्या हाती सत्ता देईल, असा विश्वास खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केला आहे. भाजप प्रवेशाबद्दल खासदार धोत्रे यांनी सभापती भिमराव पावले यांचे स्वागत केले. 

संबंधित लेख