mla gore should give chance for me : thakur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आमदार गोरेंनी आता मला विधानसभेसाठी संधी द्यावी..तसं आमचं ठरलयं : ठाकूर

हरिदास कड
रविवार, 9 सप्टेंबर 2018

चाकण : खेड (जि. पुणे) तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार सुरेश गोरे व शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी खेड तालुक्यातील शिवसेना पक्षाची स्थिती यावर चर्चा झाली. या बैठकीत माजी सभापती रामदास ठाकूर यांनी मला बोलायचंय असे म्हणत यावेळी मला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी, संधी द्यावी, अशी मागणी केली.

चाकण : खेड (जि. पुणे) तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार सुरेश गोरे व शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी खेड तालुक्यातील शिवसेना पक्षाची स्थिती यावर चर्चा झाली. या बैठकीत माजी सभापती रामदास ठाकूर यांनी मला बोलायचंय असे म्हणत यावेळी मला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी, संधी द्यावी, अशी मागणी केली.

आमदार सुरेश गोरे आणि आमचे मागील निवडणुकीवेळी भविष्यात एकमेकांना संधी द्यायचे ठरले आहे. यावेळी त्यांनी मला संधी द्यावी असेही ठाकूर यांनी सांगितल्याने कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून समर्थनही केले. त्यामुळे आगामी काळात या दोघांत तिकिटासाठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले.

राजगुरूनगर (ता.खे़ड) येथील बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनेचे पदाधिकारी ,शिवसेना नेते खासदार राऊत, आमदार गोरे व कार्यकर्ते यांची येत्या लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या आढावा बैठकीत खेड तालुका शिवसेनाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनी तालुक्यातील पक्षाची स्थिती चांगली आहे . तालुक्यात विकासकामे अधिक झाली आहेत. यावेळी आमदार गोरे पन्नास हजारावर मताधिक्क्याने निवडून येतील असे सांगितले. आमदार गोरे यांनी विचार व्यक्त करावेत असे सांगण्यात आले.

त्यावेळी माजी सभापती रामदास ठाकूर मध्येच उठले आणि मला बोलायचंय असे सांगून त्यांनी विचार व्यक्त केले. ठाकूर यांनी सांगितले की, मी २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी मला शिवसेनेचे जर तिकिट असते तर मी विजयी झालो असतो. तालुक्यात २००९ मध्येच भगवा फडकला असता. मला चाळीस हजार मते त्यावेळी पडली. यावेळी शिवसेनेने मला उमेदवारी दिली तर मी एकावन्न हजार मताधिक्क्याने विजयी होईल असे सांगितले. 

खासदार राऊत यांनी ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर भाषणात उद्दव ठाकरेंशी याबाबत बोलतो असे सांगितले. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे , पक्षाचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर कार्य़कर्ते उपस्थित होते. माजी सभापती ठाकूर यांनी उमेदवारीची डरकाळी फोडल्याने शिवसेनेत उमेदवारीसाठी पुढील काळात रस्सीखेच असल्याचे दिसते आहे.

संबंधित लेख