आमदार गोगावले व माजी आमदार जगताप यांच्यात कालगुडेंच्या मृत्यूवरून खडाजंगी

आमदार गोगावले व माजी आमदार जगताप यांच्यात कालगुडेंच्या मृत्यूवरून खडाजंगी

महाड : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे महाड मधील प्रमुख नेते सुरेश कालगुडे यांचा मृत्यू प्रकरणी आता आरोप -प्रत्यारोप सुरू झाले असुन आगामी ग्रामपंचायत व विधानसभा निवडणुकीत कालगुडे यांचा मृत्यु प्रमुख मु्द्दा होत असल्याचे दिसत आहे. सुरेश कालगुडे यांचा मृत्यू अपघात कि घातपात यावरुन आजीमाजी आमदारांत खडाजंगी सुरु झाली आहे.

महाड एमआयडीसी मधील झुआरी ऍग्रोकेम या कंपनीत सुरेश कालगुडे यांचा जेसीबी होता. त्यावरील चालकाचे व कंपनीत आलेल्या कंटेनर चालकाचे 3o डिसेंबर 2o18 ला मध्यरात्री भांडण झाले होते. या दरम्यान तेथे आलेल्या सुरेश कालगुडे यांची कंटेनर चालकाजवळ वादावाद झाली. त्यातुन चालकाने कंटेनर अंगावर चढवून कालगुडे यांची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हा मृत्यु घातपात कि अपघात अशा वादाला तोंड फुटले आहे. आमदार भरत गोगावले व माजी आमदार माणिक जगताप यांच्यात आरोप- प्रत्यारोप रंगत आहेत.

कालगुडे यांचा मृत्यू अपघाती मृत्यु असुन याबाबत जगताप राजकारण करत असल्याचा आरोप आमदार गोगावले यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तर त्यानंतर कालगुडे यांचा अपघात नसून तो घातपातच असल्याचा पुनरुच्चार माजी आमदार माणिक जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन केल्याने आगामी निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

माणिक जगपात यांनी आपण मृत्यूचं राजकारण करत नाही. याबाबत पोलीस प्रशासनाने खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे घातपात झाला हे मी नव्हे तर पोलिसच व्यक्त करत आहेत, असे सांगत आमदारांबाबत अनेक प्रश्नचिन्हे परिषदेत उपस्थित केली.

ज्या कंपनीच्या आवारात हा प्रकार घडला त्या कंपनी मालकाला अद्याप अटक नाही. म्हणजेच कारखाना मालक आणि आमदार यांच्यात साटेलोटे आहेही उघड होते, असा आरोप देखील त्यांनी केला. माणिक जगताप यांच्या या विधानामुळे तालुक्यातील राजरिय वातावरण आता तापू लागले आहे. सुरेश कालगुडे हे आमदार गोगावले यांचे निकटवर्ती व शिवसेनेचे खंदे नेते होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com