MLA Devyani Pharande helped Women for Ration Cards | Sarkarnama

शिधापत्रिकांसाठी भाजप आमदार देवयानी फरांदे मतदारांच्या दारी 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

शासकीय योजनापासून वंचितांसाठी आमदार देवयांनी फरांदे यांना कथडा भागातील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठान यांनी साह्य केले. पठाण या भागात नागरीकांसाठी विविध सामाजिक कामे करतात. त्यांनी महिलांच्या अडचणींबाबत शिबिर भरविण्याची कल्पना मांडली. त्याला आमदार फरांदे यांनीही होकार दिल्यावर तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह मंगळवारी त्यांनी या भागातील मौलाना अब्दुल गनी सभागृहात शिबिर घेतले.

नाशिक : शहरातील जुन्या नाशिक भागात नागरिकांना अनेक सरकारी योजनांचा लाभच मिळत नाही, अशा तक्रारी असतात. त्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी थेट मतदारांसाठी शिबिर भरविले. अनेक मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. यावेळी शेकडो नागरिकांना रखडलेल्या शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले व निराधार योजनेचा लाभ मिळवुन दिल्याने मतदार विशेषतः महिला चांगल्याच खूष झाल्या. 

शासकीय योजनापासून वंचितांसाठी आमदार देवयांनी फरांदे यांना कथडा भागातील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठान यांनी साह्य केले. पठाण या भागात नागरीकांसाठी विविध सामाजिक कामे करतात. त्यांनी महिलांच्या अडचणींबाबत शिबिर भरविण्याची कल्पना मांडली. त्याला आमदार फरांदे यांनीही होकार दिल्यावर तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह मंगळवारी त्यांनी या भागातील मौलाना अब्दुल गनी सभागृहात शिबिर घेतले. त्यानंतर आमदार फरांदे कार्यकर्त्यांसह या भागात घरोघरी जाऊन महिलांना भेटल्या. त्यांच्या समस्या समजावुन घेत शासकीय अधिकाऱ्यांना त्याचे निराकरण करण्यास सांगितले. 

बहुतांश झोपडपट्टीच्या या भागात नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे धान्यही मिळत नाही. प्रशासनाकडून दुर्लक्ष होते. या पिडीतांच्या समस्यांचे निराकरण आमदार फरांदे, सामाजिक कार्यकर्ते पठाण यांनी केले. उत्पन्नाचा दाखला, जुन्या व फाटलेल्या शिधापत्रिका बदलून देणे, नवीन शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी आवश्‍यक कागदपत्रांअभावी वंचीत राहिलेल्यांना मार्गदर्शन केले. शासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी विविध बाबींची पूर्तता करुन घेतली. तहसीलदार आवळकंठे, पुरवठा अधिकारी अनिल पुरी, नायब तहसिलदार व्ही. आर. मोरालकर, मनिषा माने आदी यावेळी उपस्थित होते. 

संबंधित लेख