MLA Dattatray Bharne brings 36 crore from government for developmental works | Sarkarnama

इंदापूर तालुक्यासाठी हिवाळी अधिवेशामध्ये ३६ कोटी रुपये मंजूर : आमदार दत्तात्रेय भरणे 

राजकुमार थोरात 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

.

वालचंदनगर :   इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व  न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी  हिवाळी अधिवेशनामध्ये  सन २०१८-१९ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. 

गेल्या दोन दिवसापासुन मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशानास सुरवात झाली आहे. यामध्ये सार्वजनिक  बांधकाम विभागाने सन २०१८-१९ चे  पुरवणी अर्थसंकल्प सादर केला.  यामध्ये इंदापूर तालुक्यासाठी आमदार भरणे यांच्या प्रयत्नामुळे ३५ कोटी ९६ लाख रुपये  निधी मंजूर झाला. पुणे जिल्हामध्ये सर्वाधिक निधी इंदापूर तालुक्याला मिळाला आहे.यामध्ये तालुक्यातील ९ रस्त्याचे कामे मार्गी लागणार असून दळणवळण सोईचे होणार आहे. 

आमदार भरणे यांनी गेल्या चार वर्षामध्ये रस्त्याच्या कामासाठी  कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.  ३५ कोटी ९६ लाखामध्ये इंदापूर शहरातील न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रस्त्याच्या कामासाठी  २१ कोटी ९६ लाख रुपये मंजूर झाले असून यामध्ये पिंपरी-गिरवी- आडोबा वस्तीच्या या साडेसहा कि.मी लांबीच्या रस्त्यासाठी नॉन प्लॅन अंतर्गत ४ कोटी ५५ लाख रुपये मंजूर झाले अाहेत. 

 रामवाडी-निमगाव केतकी- लाखेवाडी रस्त्याचे  नाबार्ड अंतर्गत करण्यात येणार असून या कामासाठी ३ कोटी ३८ लाख रुपये, सार्वजनिक बांधका विभागाच्या माध्यमातुन वालचंदनगर-अंथुर्णे -शेळगाव-व्याहाळी-कौठळी रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी, निमगाव केतकी -रामकुंड-शेटफळ हवेली रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ५० लाख रुपयेमंजूर झाले आहेत.

राजेवाडी-पोंदकुलवाडी -निमगाव केतकी- लाखेवाडी , व वालचंदनगर -रणगाव -शिरसटवाडी -भोडणी  या दोन रस्त्यासाठी कामासाठी प्रत्येकी २ काेटी रुपये, कळंब- लासुर्णे, वालचंदनगर-सराफवाडी-रेडा-वकीलवस्ती व  लोणी-वरकुटे- कळाशी-गंगावळण या तिन्ही रस्त्याच्या कामासाठी प्रत्येकी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी तालुक्यामध्ये जास्ती जास्ती निधी आणण्यासाठी प्रयत्न  सुरु असल्याचे भरणे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख