शिवसेनेचे 15 आमदार भाजपसोबत जातील;चिखलीकरांचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे 15 आमदार भाजपसोबत जातील;चिखलीकरांचा गौप्यस्फोट

सशुल्क दर्शन सुरु करण्याचा मंदिर समितीने विचार सुरु केला आहे.समितीने सशुल्क दर्शनाचा निर्णय घेतला तर आमदार म्हणून माझा पाठिंबा आहे. मंदिर अधिनियमात दुरुस्ती करावी लागत असेल तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करु असेही यावेळी आमदार चिखलीकरांनी सांगितले.

पंढरपूर : शिवसेनेचे अनेक आमदार नाराज आहेत. एकनाथ शिंदे वगळता एकाही विधानसभेच्या आमदाराला मंत्रीपद  न मिळाल्याने नाराज आमदारांची संख्या  वाढली आहे. त्यामुळे काही सेना आमदार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांग , आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सेनेचे किमान 15 आमदार भाजपा सोबत जातील, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नाराज आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पंढरपुरात केला.

आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार चिखलीकर पंढरपुरात आले होते. चंद्रभागानदी, मंदिर परिसर, दर्शनबारी आदी ठिकाणी भेट देवून पाहाणी केली.  

विश्रामगृह येथे आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सध्याच्या सेनेतील राजकीय परिस्थिती विषयी विचारले असता, हिवाळी अधिवेशना पूर्वी शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल अशी शक्यता आहे. शिवसेनेत तुमच्या सारखे काही नाराज आमदार आहेत का असे विचारले असता, आमदार चिखलीकर म्हणाले, माझ्या सारखे किमान 20 आमदार पक्षावर नाराज आहेत. नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे चार आणि कोल्हापूर जिल्ह्यात 6 आमदार असताना एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. जवळच्या लोकांना मंत्रीपद दिल्याने सेनेच्या आमदारांमध्ये असंतोष खदखदतोय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे किमान 15 आमदार भाजप सोबत जातील.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com