mla charan waghmare -tumsar bhandara dist | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आजचा वाढदिवस : चरण वाघमारे, आमदार - भाजप (तुमसर जि. भंडारा) 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 जानेवारी 2019

ग्रामीण भागातील समस्यांची जाण असलेला तरुण नेता म्हणून त्यांची ओळख आहे. विदर्भातील नेते दत्ता मेघे यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय होता. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य व बांधकाम सभापती म्हणूनही त्यांनी भंडारा जिल्हा परिषदेत काम केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात आल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 

संबंधित लेख