mla chandradeep narake in shivsena meeting | Sarkarnama

शिवसेनेसाठी मी भावाचा पराभव केलाय! 

युवराज पाटील 
मंगळवार, 12 मार्च 2019

मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीत "करवीर' मधून 85 हजार इतकी मते दिली होती.

कोल्हापूर : 'ताकाला जाऊन मोगा लपविणारा मी नाही. माझ्याकडे बोट दाखवायचे नाही. शिवसेनेसाठी चुलत भावाचाही मी पराभव केला आहे,' अशा शब्दांत आमदार चंद्रदीप नरके यांनी आज आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

काही लोकांमुळे गेल्या निवडणुकीत आपला विजय हुकला. त्यांची नावे जाहीर करण्याची माझी तयारी आहे. यापुढे कुणी गद्दारी केली तर रावते साहेब, त्याला शिक्षा द्या, तरच शिवसेनेचा खासदार होईल असे जिल्हाप्रमूख संजय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेचा गटप्रमूख आणि बीएलएचा मेळावा आज चांगलाच गाजला. 

रामकृष्ण हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यास कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरके यांनी सुरवातीला बोगस मतदारांवर बूथ प्रमूखांनी लक्ष ठेवावे. गेल्यावेळी बाचणीतील नावे बालिंग्यात लागली होती, असे सांगून भाषणास सुरवात केली. सुरवातीला शांत वाटणारे नरके अचानक आक्रमक झाले. प्रा. संजय मंडलिक यांची निवडणूक ही आमची निवडणूक आहे. त्यांच्याविषयी सकारात्मक बाबी आहेत त्या सांगत चला. ताकाला जाऊन मोगा लपविणारा (संजग घाटगे यांच्याकडे पाहून बाबा असा उल्लेख करत) मी कार्यकर्ता नाही. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीत "करवीर' मधून 85 हजार इतकी मते दिली होती. त्यावेळी कर्जमाफीच्या अडचणी होत्या. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. शिवसेनेसाठी जिल्हा परिषद निवडणुकीत चुलत भावाचा पराभव केला आहे. ज्यांना तिकडे जायचे आहे त्यांनी आजच जायचे आहे. माझ्यासोबत थांबायचे नाही. जिल्हा दूध संघाचा (गोकुळ) गावागावातील डेअरीपर्यंत झाला आहे. सहकारी संस्थेतील एकही कर्मचारी प्रचारात दिसता काना नये, मल्टीस्टेटला आम्ही विरोध केला. जनरल सभा हाणून पाडली. आपल्यातही काही झारीचे शुक्राचार्य आहेत. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. यापुढे असे चालणार नाही. गाठ माझ्याशी आहे.' 

श्री. नरके म्हणाले,"सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा प्रा. मंडलिक यांनी जबाबदारीने चालविला आहे. मतदारसंघात ज्यांचे दर्शन होत नाही ते आता पैशाचा आणि प्रलोभनाचा वापर करू लागले आहेत. त्यांच्याकडे कोण जातय ते तपासा. मंडलिक यांच्या विजयासाठी चंद्रकांत पाटील यांची जबाबदारी महत्वाची आहे.' तत्पुर्वी झालेल्या भाषणात संजय पवार यांनी पक्षातील गद्दारांवर बोट ठेवले. ज्यांच्यामुळे गेल्यावेळी तोंडचा घास गेला त्यांची नावे जाहीर करण्याची माझी तयारी आहे. साट्यालोट्याचे राजकारण आणि यापुढे गद्दारी केली तर कोणालाही सोडणार नाही, असा इशारा श्री. पवार यांनी दिला.  

संबंधित लेख