MLA Bhimrao Tapkir birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मितभाषी आणि मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे आपला माणूस अशी ओळख निर्माण करण्यात खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यश आले आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविली आणि आमदार झाले. ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. 

मितभाषी आणि मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे आपला माणूस अशी ओळख निर्माण करण्यात खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यश आले आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविली आणि आमदार झाले. ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. 

पुणे महापालिकेत 1997 साली 23 गावांचा समावेश झाल्याने धनकवडी येथील युवा कार्यकर्ते भीमराव तापकीर यांना संधी मिळाली. महापालिकेच्या 2002 व 2007च्या निवडणुकीत ते नगरसेवक झाले. ते नगरसेवक असताना 
दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे 2011 मध्ये अचानक निधन झाले. त्यावेळी, तापकीर यांना उमेदवारी मिळाली. वांजळे यांच्या कुटुंबियाबाबत सहानुभूतीची लाट होती. वांजळे यांच्या पत्नी असताना देखील तापकीर 2350 मताधिक्‍याने निवडून आले. 

तापकीर 2002 मध्ये नगरसेवक असताना धनकवडी व सिंहगड रस्ता परिसर असा त्यांचा वॉर्ड होता.धनकवडीतील पाणी प्रश्नावर आंदोलन केले. सिंहगड रस्त्यावरील अनेक प्रश सोडविले होते. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. त्या दोन अडीच वर्षात त्यांनी मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढविला. त्याचा फायदा त्यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीत 63 हजार मताधिक्‍याने विजयी झाले आहेत. त्यापूर्वी 2011च्या पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभूत केले. तेथेच 2014 च्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला यशाची मुहूर्तमेढ झाल्याचं कार्यकर्ते म्हणतात. 

पक्षाशी निष्ठा असल्यामुळे आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले असताना पोटनिवडणुकीत संधी मिळाली ते आमदार झाले. पुण्यातून आठ आमदार निवडून आले त्यामध्ये त्यांचा समावेश आहे. 

संबंधित लेख