mla bhaskar jadhav aquital | Sarkarnama

आमदार भास्कर जाधव निर्दोष ; नीलेश राणे यांचे कार्यालय फोडल्याचे प्रकरण! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

चिपळूण (रत्नागिरी) : माजी खासदार नीलेश राणे यांचे चिपळूणमधील कार्यालय फोडल्याच्या आरोपातून आमदार भास्कर जाधव यांच्या 9 सर्मथकांची खेडच्या सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सहा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. 

गुहागरचे आमदार भास्कर जाधव आघाडी सरकारचे राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी निधी मिळत नाही, अशी तक्रार कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नीलेश राणे यांच्याकडे केल्यानंतर राणे आणि जाधव यांच्यात खडाजंगी झाली. पुत्रप्रेमापोटी नारायण राणेही जाधव यांच्या विरोधात गेले. कोकणातील दोन नेत्यांमधील वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचला. नीलेश राणे यांच्या समर्थकांनी भास्कर जाधवांचे कार्यालय फोडले. त्यानंतर जाधव समर्थकांनी नीलेश राणे यांचे चिपळूणमधील कार्यालय फोडले. शहरातील एका हॉटेलवर दगडफेक केली. 2011 मध्ये घडलेल्या या घटनेत भास्कर जाधव यांच्या नऊ समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता. खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. पुराव्याअभावी जिल्हा न्यायाधीशांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली. 

संबंधित लेख