mla bharne targets pmc | Sarkarnama

आमदार भरणे इंदापूरच्या पाण्यासाठी विधानसभेत आक्रमक... पुण्यात कपात करण्याची मागणी

राजकुमार थोरात
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी आमदार दत्तात्रेय भरणे आज विधानसभेत आक्रमक झाले. पुणे महानगरपालिका पाण्यासाठी अरेरावी करीत असून ती बंद करण्याची मागणी त्यांनी केली.

खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये  पुणे शहराने ११५० एमएलडी पाण्याची वापर करावयाचा ठरले होते. मात्र पुणे पालिका पाण्याच्या बाबतीत अरेरावी करीत असुन १३५० एमएलडी पाणी वापर करीत आहे. याचा थेट परीणाम इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर होत असून इंदापूर तालुक्याला पाणी अपुरे पडत आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.

 इंदापूर तालुक्यासह जिल्हामध्ये यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तसेच शेतीला पाणी कमी मिळत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला अाहे.  पाटबंधारे विभागाने खडकवसाला धरणातुन रब्बीचे एक आवर्तन इंदापूर तालुक्याला अपुरेच दिले असून याचा परीणाम शेतीवरती झाला आहे, असे त्यांनी सांगितले. 

गेल्या महिन्यामध्ये ११५० एमएलडी  पाण्याचा  वापर करण्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरले होते. मात्र   महानगरपालिका अरेरावी करुन १३५० एमएलडी पाणी वापर करीत असल्याने इंदापूर तालुक्याला उन्हाळी आवर्तन मिळण्याची शक्यता कमी असल्याचा मुद्दा त्यांनी आक्रमकपणे मांडला.

पुण्याचे पाललकमंत्री गिरीश बापट यांनी  तातडीने यात  लक्ष घालून पुण्याची पाणी कपात करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच इंदापूर तालुक्यातील भीमा व नीरा नदीवरील बुडीत बंधारे मंजूर केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याने बंधारे मंजूर करण्याची मागणी  अधिवेशनामध्ये केली.

संबंधित लेख