झिंग झिंग झिंगाट ..गाण्यावर आमदार भरणेंचा सैराट डान्स !

रामायण वाचन ते झिंग झिंग झिंगाट गाण्यावर डान्स अशी आमदार भरणेंची दोन वेग वेगळी रूपे गावकर्यांना पाहावयास मिळाली .
Bharne dance
Bharne dance

कळस : पळसदेव (ता. इंदापूर) येथे शिवशाही व भीमशाही युवा प्रतिष्ठाणतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी 'राष्ट्रवादी पुन्हा' .... या गाण्यावर डान्स केला. 

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तरुणांमध्ये मिसळत 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय'... या गाण्यापासून ते 'झिंग झिंग झिंगाट' .... गाण्यावर आमदारांचा चांगलाच सैराट डान्स ग्रामस्थांना पहायला मिळाला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, खरेदी-विक्री संघाचे सभापती अशोक चोरमले आदींनी त्यांना सोबत देत तेही तरुणाईच्या घोळक्यात नाचण्यात दंग झाले.

शुक्रवारी रात्री येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी आमदार भरणे, सभापती माने, अशोक चोरमले आदींनी येथे हजेरी लावली होती. तब्बेत बरी नसतानाही आमदार भरणे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.

दरम्यान उपस्थितांची भाषणे झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार भरणे यांचे भाषण होणार होते. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना नाचण्याचा आग्रह केल्यानंतर स्टेजवरून थेट खांदावर उचलून घेवूनच त्यांना नाचविले.यावेळी इंदापूरच्या तिरंगा मात्र मंडळाने पाच थर लावून दहिहंडी फोडली. त्यांना चषक व 11 हजारांचे बक्षिस सभापती माने यांच्याहस्ते देण्यात आले.

विशेष म्हणजे , या कार्यक्रमापूर्वी गावातच माळेवाडी भागात रामायण वाचनाचा कार्यक्रम होता . या कार्यक्रमात आमदार भरणे आणि सभापती प्रवीण माने यांनी सहभाग नोंदवत रामायणाचे वाचन केले होते . रामायण वाचन ते झिंग झिंग झिंगाट गाण्यावर डान्स   अशी आमदार भरणेंची  दोन वेग वेगळी रूपे गावकर्यांना पाहावयास मिळाली . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com