mla bharat bhalake press in mangalwedha | Sarkarnama

लैला मजनूसारखा अर्थ काढू नका : आमदार भालके

हुकूम मुलाणी
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

शरद पवार व सुशिलकुमार शिंदे हे पोटच्या मुलासारखे संभाळतात.

मंगळवेढा (सोलापूर): मी पक्ष बदलणार असल्याच्या नुसत्या वावड्या असल्याचे सांगत आमदार भारत भालके य़ांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला.

येथील श्रीराम मंगल कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भालके म्हणाले की, पंढरपूरातील काँग्रेस मेळाव्यातही आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी मंगळवेढा सोडून अन्य तालुक्यांना निधी दिला. शरद पवार व सुशिलकुमार शिंदे हे पोटच्या मुलासारखे संभाळतात. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत दोन माजी मुख्यमंत्री माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यावर पक्ष बदलण्याचे का आठवेल, असे म्हणत उलट पुढील महिन्यातही मला दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करावा लागेल याचाही अर्थ लैला मजनू सारखा कुणी काढू नये. 

संबंधित लेख