mla baroro son wedding sharad pawar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

पवारसाहेबांच्या उपस्थितीसाठी आमदार बरोरांनी दोन वर्षे पुढे ढकलले मुलाचे लग्न ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी राजकारणच नव्हे तर विविध क्षेत्रातील माणंस जोडली. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणंसही ढिगानं. साहेबांवर असं प्रेम करणारे राष्ट्रवादीचे शहापूरचे (जि.ठाणे) आमदार पांडूरंग बरोरा हे काहीसे वेगळेच. 

मुलाच्या लग्नाला पवारसाहेब उपस्थित राहोवे म्हणून बरोरा यांनी आपल्या मुलाचे लग्न एक दोन महिने नव्हे तर दोन वर्षे पुढे ढकले होते. आता साहेबांच्या उपस्थित आज सांयकाळी साडेसहा वाजता (ता.22) बरोरांच्या मुलाचा आणि त्याचबरोबर मुलीचाही विवाह होत आहे. 

बरोरांचा निखिल हा मुलगा आणि नेहा ही मुलगी. निखिल हे ही राजकारणात आहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आहेत. 

मुलाच्या आणि मुलीच्या विवाहासाठी पवारसाहेबांनी उपस्थितीत राहण्यासाठी आमदार बरोरा हे साहेबांच्या पीएना अनेकदा भेटले पण, तारीखच मिळत नव्हती. अखेर स्वत: बरोरा यांनी साहेबांची भेट घेतली आणि सांगितले की साहेब आपण जी तारीख द्याल त्यादिवशी माझ्या मुलांची लग्न होतील.

साहेबांनी तारीख दिली 22 डिसेंबर. अर्थात या तारखेचा मुहुर्तही पाहिला नाही. साहेबांची उपस्थिती हेच महत्त्वाचे होते. साहेबांनी दिलेल्या तारखेनुसार हा विवाह होत असून प्रचंड गर्दी शहापूरात आहेत. मंडपापासून अर्धा किलोमीटर लांब रांग लागली आहे. 

या विवाह सोहळ्यास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी मंत्री सुनील तटकरे, चित्रा वाघ, माजी मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते व आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आमदार किसन कथोरे, कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे, बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर तसेच खासदार कपिल पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार दत्ता भरणे, कुणबी सेनाप्रमुख विश्‍वनाथ पाटील आदी मान्यवरांनाही आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.  

संबंधित लेख