mla baliram siraskar sit on ground on akola | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची भेट नाकारल्याने आमदार सिरस्कारांनी रस्त्यातच ठाण मांडले 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

अकोला ः जिल्ह्यातील पातूर व अकोट तालुका त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले खरे. पण, मुख्यमंत्री बैठकीत असल्याने त्यांना सोडण्यात आले नाही त्यामुळे आमदार बळीराम सिरस्कार व जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठाण मांडले. 

भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री आढावा बैठकीत व्यस्त होते. पोलिसांनी निवेदनकर्त्यांना आत सोडण्यास नकार दिल्याने वादावादी झाली.अखेर मुख्यमंत्र्यांतर्फे नायब तहसिलदारांनीच निवेदन स्वीकारून वादावर पडदा टाकला. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरूवार (ता.14) विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अकोल्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील पातूर व अकोट तालुका त्वरीत दुष्काळग्रस्त जाहीर करावा, महापालिकेतील 16 रस्त्यांचे सोशल ऑडीटमध्ये निकृष्ट दर्जा असल्याचे स्पष्ट झाल्याने दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी वानखडे यांच्याबरोबरच आमदार  सिरस्कार, माजी आमदार हरिभाऊ भदे, अरुधंती सिरसाट, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, प्रभाताई सिरसाट, शोभाताई शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखान पठाण, प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सिमांत तायडे, शंकरराव इंगळे, बळीराम चिकटे, डॉ. प्रसन्नजीत गवई, धनश्री देव, प्रतिभाताई अवचार, गोपाल कोल्हे, श्रीकांत ढगेकर, प्रा. शैलेश सोनोने, बुद्धरत्न इंगोले आदी पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.  
 
संबंधित लेख