mla bachhu kadu to take yatra to cm bungalow | Sarkarnama

आमदार बच्चू कडूंचे देहू ते वर्षा बंगला पायी आंदोलन जाहीर 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे : अपंग बांधवांच्या विविध मागण्यासाठी दोन ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवास (वर्षा) पायी चालत आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांनी जाहीर केले. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त सिंचन भवन येथे आयोजित अपंग मेळाव्यात ते बोलत होते. 

यावेळी कडू म्हणाले, ""अपंगांना वेगवेगळ्या क्षेत्रात आरक्षण दिले पाहिजे. दुकानांसाठी गाळे, घरकुल, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात शासनाने आरक्षण दिले तर या अपंग व्यक्ती स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. मागील ७० वर्षापासून अपंगांकडे मुद्दाम दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आता हा लढा द्यावा लागत आहे.'' यावेळी कामगार नेते बाब आढाव, अपंग कल्याण मंडळाचे आयुक्त रुचेश जयवंशी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी आढाव यांनी अपंग कल्याण मंडळाला निधी किती मिळतोय, मिळणारा निधी पुरेसा आहे का, मंडळात कामगारांची संख्या किती आहे? असे प्रश्‍न उपस्थित करत मंडळामधील पदे ही अपंग व्यक्तीसाठी राखीव असावीत. अशी मागणी आढाव यांनी केली. ते म्हणाले. ""अपंग असणे हा गुन्हा नाही, त्यामुळे त्यांनी अभिमानाने जगण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाय योजना करायला हव्या आहेत.'' 

यावेळी उपस्थितांनी मंडळाच्या आयुक्तांसमोर आपल्या समस्या मांडल्या. त्यावर आयुक्तांनी या समस्यांबाबत पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विभागीय स्तरावर बैठक घेण्याची घोषणा केली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख