निवडणुकीमुळे आमदार अनिल कदम बंद काचांच्या गाडीतून थेट मोटारसायकलवर! 

एरव्ही विशिष्ट चौकटीत राहणारे नेते चौकट सोडून वागायला लागले की निवडणुका जवळ आल्या असे समजावे. निफाडचे आमदार अनिल कदम हे देखिल त्याला अपवाद नाहीत. एरव्ही बंद असणाऱ्या यांच्या गाडीच्या काचा आता सतत उघडलेल्या दिसू लागल्या आहेत. एव्हढेच नव्हे तर कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी ते थेट मोटारसायकलीवरुनही फिरताना दिसू लागले आहेत.
निवडणुकीमुळे आमदार अनिल कदम बंद काचांच्या गाडीतून थेट मोटारसायकलवर! 

निफाड : एरव्ही विशिष्ट चौकटीत राहणारे नेते चौकट सोडून वागायला लागले की निवडणुका जवळ आल्या असे समजावे. निफाडचे आमदार अनिल कदम हे देखिल त्याला अपवाद नाहीत. एरव्ही बंद असणाऱ्या यांच्या गाडीच्या काचा आता सतत उघडलेल्या दिसू लागल्या आहेत. एव्हढेच नव्हे तर कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी ते थेट मोटारसायकलीवरुनही फिरताना दिसू लागले आहेत. 

शिवसेनेचे आमदार कदम यांची लाईफ स्टाईल अतिशय नेटकी असते. विविध प्रश्‍नांवर आणि विधीमंडळातही आक्रमक कार्यशेलीचे आमदार म्हणुन मतदारसंघात त्यांचा दबदबा आहे. अनेकदा यावरुन त्यांचे अधिकाऱ्याशीही खटके उडतात. निवडणुकीची चाहुल लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपारीक विरोधकांबरोबरच ओझर या त्यांच्या होमपिचवर त्यांचेच चुलतबंधु यतीन कदम यांची विधानसभा निवडणुकीसाठी फिल्डींग सुरु आहे. त्यात आमदार कदम यांच्या हक्काच्या मतांनाच धक्का लागणार हे स्पष्ट झाले आहे. 

दोन महिन्यांपूर्वी मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्‍नांवरुन यतीन कदम यांनी सर्वपक्षीयांना एकत्र करीत मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे जाग्या झालेल्या कदम यांनी गेल्या महिन्याभरात जवळपास सर्व भागातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन व लोकसंपर्क मोहीम राबविली आहे. त्यात दुरावलेले कार्यकर्ते जोडण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे एरव्ही बंद काचांच्या गाडीने प्रवास करणारे कदम यांच्या गाडीच्या काचा उघड्या असल्याचे सध्या दिसते. असतात. काचा बंद करायच्या नाहीत अशा सूचनाच त्यांनी दिल्या आहेत. 

अगदी चौकात, रस्त्यांत घोळका दिसला की ते आवर्जून थांबायला, कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेऊन हसून संवाद करायला लागले आहेत. गळ्यात हात घालुन जवळीक साधू लागले आहेत. एव्हढेच काय मळे, वस्त्यांत जाऊन पाहुणचार घेतानाही ते दिवसात. अगदी कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवर मागे बसुन त्यांना फिरताना पाहुन मतदारांच्या चेहऱ्यावर हसू फुटत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com