रावसाहेब दानवे लक्षात ठेवा, धुळेकरांनी सुरेश जैनांचे पार्सल परत पाठवले होते!

रावसाहेब दानवे लक्षात ठेवा, धुळेकरांनी सुरेश जैनांचे पार्सल परत पाठवले होते!

पुणे: धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांचा विरोध डावलून भारतीय जनता पक्षाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धुळे महापालिका प्रभारी म्हणून निवड केली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या गोटेंनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून इशारा दिला आहे. धुळेकर बाहेरच्या नेत्यांना स्विकारत नाहीत, यापुर्वी सुरेश जैनांनी प्रयत्न केला होता, मात्र त्यांचे पार्सल परत पाठवले होते, अशा शब्दांत त्यांनी पुर्वइतिहासाची आठवण दानवेंना करुन दिली आहे.

गोटे यांचे पत्र पुढीलप्रमाणे : 

माननीय रावसाहेब दानवे 
अध्यक्ष 
भारतीय जनता पार्टी महाराष्र्ट प्रदेश 
सप्रेम नमस्कार,

आत्ताच प्रदेश भाजपातर्फे प्रसिध्दीस दिलेले श्री गिरीष महाजन यांची धुळे पालीका निवडणुकीच्या प्रभारी पदी नियुक्ती केल्याचे पत्र व्हाट्स अॅपवर वाचावयास मिळाले. आपल्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत ! प्रश्न असा आहे की, महाराष्र्टात यापूर्वी झालेल्या किती पालीका निवडणुकींमधे प्रदेशाने असे बाहेरच्या जिल्ह्यातील प्रभारी नियुक्त करुन पाठविले ? "धुळे जिल्ह्यातील भाजपामधे गटबाजी आहे यासाठी प्रभारी नेमले " आपले म्हणणे मान्य आहे. महाराष्र्टातील कुठला जिल्हा गटबाजी मुक्त आहे ? हेही कळाले तर बरे होईल ! 

माझ्या असे लक्षात आले की, प्रामाणिक , निष्ठावान पक्षाशी इमान राखणार्‍या कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्वाच्या लेखी किंमत राहीली नाही. पक्षाच्या धेय्य धोरणाशी विसंगत मी कुठले काम केले ? किंवा शत्रू पक्षाशी हात मिळवणु करुन स्वतःच्या भावाला , मुलाला संस्थांवर संचिलकपदी पक्ष पॅनलशी गद्दारी करुन निवडून आणले याच एक तरी उदाहणण महाराष्र्टाल कळू द्या ! स्वर्गिय अटलजींच्या दुखवटा सप्ताहात सत्कार घेवून पूर्वी झालेल्या भूमीपूजनाचे पुनश्च भुमीपूजन करण्याचे अशोभनीय कृत्य केले ? असो ! 

एक निश्चित की, बदल्यांमधे दलाल्या करणारे, नामचीन गुंडांच्या टोळी प्रमुखांच्या घरी येरझार्‍या घालून तुम्ही आमच्या पक्षात या म्हणून लाल गालीचा घालणारे, ज्यांना दिन दयालजी, त्यांचा एकात्म मानववादाचा स्पर्श नसणारे, पिंताबर दासजी, बलराज मधोक, नानाजी देशमुख , रामभाऊ म्हाळगी, मोतीरामजी लहाने, बच्छराजजी व्यास, सुर्यभानजी वानखेडे जगन्नाथराव जोशी यांची नावे सुध्दा कानावरुन न गेलेल्यांची चलती सध्या पक्षात आहे . आमच्या सारख्या जुनाटाना नव्या रचनेत स्थान नाही हे आपण वेळीच लक्षात आणून दिले. या बद्दल धन्यवाद ! आभार !

पक्षाच्या स्थानिक आमदाराला विश्वासात न घेता परस्पर नियुक्ती करण्याच्या लोकशाही प्रक्रीयेला सलाम ! जो आमदार दोनदा अपक्ष निवडून आला. स्वतःच्या बळावर बहुमताने स्वतःच्या पत्नीस नगराध्यक्षपदी बहुमतासह निवडून आणले. अशा लोकप्रतिनिधीवर अविश्वास दर्शवून त्याचा प्रतिष्ठेला धक्का लावण्याच्या पक्षांर्तगत लोकशाहीचा विजय असो !

एक बाब सहज लक्षात आणून देतो. असा प्रयोग श्री सुरेश जैन यांनी करुन पाहीला होता. धुळेकरांनी जळगांवच पार्सल परत केले. त्याची पुर्नरावृत्ती केल्या शिवाय धुळेकर रहाणार नाहीत. धुळ्याची जनता जबरदस्त स्वाभीमानी आहे. त्यांना बाहेरुन कुणी येवून आपल्याला अक्कल शिकवेल ही कल्पनाच सहन होणारी नाही. जिल्ह्यातीलच पण शिरपूरचे विकास पुरुष श्री अमरिष भाई पटेल यांना सलग तीन वेळा याचा अनुभव आला आहे . असो ! 

आपण वरिष्ठनेते आहात ! आपण प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांना टाळून , गुन्हेगारी व पक्ष बदलण्याची पार्श्वभूमी असणार्‍याना घेवून भाजपाचा झेंडा फडकवू शकाल ! मला तर, निष्ठावान ,कष्टाळू , कार्यकर्त्यांबरोबरच रहावे लागेल तीच माझी संप्पत्ती होती. आहे . राहील ! 
 

आपला 
अनिल गोटे 
आमदार 
आपणच नेमलेला मतदार संघाचा पालक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com