mla amdar niwas mumbai | Sarkarnama

...आम्हाला सभागृहातच सतरंजी टाकून झोपू द्या ! 

ब्रह्मा चट्टे 
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई : आम्हीच जीवंत नाही राहिलो तर काय चर्चा करणार ? मनोऱ्यावर प्रत्येक अधिवेशनात चर्चा होतेय, मात्र व्यवस्था होत नाही. आम्हाला सभागृहातच सतरंजी टाकून झोपू द्या, अशी अजब मागणी डॉ. सतीश पाटील यांनी केली. मनोरा आमदार निवासाची तात्काळ दुरूस्तीची मागणी करत विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय करण्याची मागणी करत विरोधक वेलमध्ये उतरे होते. 

आज जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या डी विंग मधील 125 नंबरच्या खोलीतील छत कोसळला. त्यामुळे मनोरा आमदार निवासाच्या प्रश्नावर विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी गदारोळ केला. निवासाची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत मागणीही सर्वपक्षीय आमदारांनी केली. 

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, " आमदारांच्या जीवावर बेतलेल्या या घटनेचे गांभीर्य ओळखून आजच्या आज जाहिरात देत राहण्याची पर्यायी व्यवस्था सरकारने करावी.'' 

सतीश पाटील यांच्या खोलीतील तुटलेल्या सिलिंगचा मोठा तुकडा सभागृहात राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी आणला होता. तो तुकडा दाखवत पवार म्हणाले, " बघितलं का हा किती मोठायं. जर ते खोलीत असते तर आज त्यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती. ही घटना गंभीर असून सर्वच आमदारांना लवकर शिफ्ट करा. टेंडरमध्ये वेळ न घालवता तातडीची गरज म्हणून ही गरज पूर्ण करा. पर्यायी व्यवस्था झाली तर ठीक नाहीतर जोवर व्यवस्था नाही होत तोवर सदस्यांना महिन्याकाठी 1 लाख रुपये द्या.'' 

अजित पवारांच्या मागणीला साथ देत सर्व पक्षीय आमदारांनी आजच्या आज आमदारांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करत गोंधळ घालण्यास सुरवात केली. वाढता गोंधळ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आमदार निवास बांधण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आज बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगितले.  
 
संबंधित लेख