मराठा आरक्षणासाठी उद्या आ.अबिटकरांचे मुंबईत उपोषण 

मराठा आरक्षणासाठी उद्या आ.अबिटकरांचे मुंबईत उपोषण 

मुंबई : राज्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता.9) राज्यभर आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास सक्रिय सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर "आत्मक्‍लेश"आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आत्मक्‍लेश आंदोलनाच्या माध्यमातून आमदार आबिटकर हे मराठा समाजाच्या आंदोलनास पाठींबा देणार आहेत. या आत्मक्‍लेश आंदोलनास परवानगी मिळावी यासाठी मागणीचे पत्र आबिटकर यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवले आहे. तसेच विधिमंडळाच्या सचिवालयाची देखील आबिटकर यांनी पत्र देऊन परवानगी मागितली आहे. 

ते उद्या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आत्मक्‍लेश आंदोलनास बसणार आहेत. विधानसभा अध्यक्षास पाठवलेल्या पत्रात आबिटकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे.याकडे लक्ष वेधले आहे. 

मराठा समाजाच्या वतीने मागील वर्षभरापासून शांततेत सुमारे 57 मोर्चे काढण्यात आले .त्यानंतरही सरकारने म्हणावी तशी दखल घेतली नसल्याचे चित्र निर्माण झाल्यावर मराठा समाजने पुन्हा आक्रमक मोर्चे काढले आहेत. याला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागले आहे. तर आरक्षण तातडीने मिळाले पाहीजे यासाठी मराठा समाजातील सहा-सात जणांचा आतपर्यत बळी गेला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com