आमदार अब्दुल सत्तार यांच्या कन्येचा विवाह सामुदायिक सोहळ्यात !

काँग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वतःच्या कन्येचा विवाह सामुदायिक सोहळ्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Abdul-Sattar-Mla
Abdul-Sattar-Mla

मुंबई :  राजकीय पुढा-यांच्या घरातील विवाह शाही थाटात करण्याची फॅशन रूढ होत चालली आहे. खर्चाची उधळपट्टी करणारे हे विवाह सामान्य लोकांमध्ये चर्चेचे विषय ठरत आहेत. पण काँग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी मात्र स्वतःच्या कन्येचा विवाह सामुदायिक सोहळ्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सत्तार यांची कन्या उजमा नाहीद यांचा विवाह सय्यद मुसद्दीकोद्दीन यांच्याशी येत्या २२ एप्रिल रोजी सोयगाव (जि. औरंगाबाद) येथे होणार आहे. तब्बल ३०० पेक्षा जास्त जोडप्यांचा विवाह यावेळी पार पडणार आहे. आमदार सत्तार आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिका मंत्री, अधिका-यांपर्यंत पोहोचवत आहेत. उच्चपदस्थांना दिली जाणारी ही निमंत्रण पत्रिकाही खूप साधी आहे. अवघ्या ७० पैसे किमतीची निमंत्रण पत्रिका आम्ही छापल्याचे सत्तार यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

"माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. इतर पुढा-यांप्रमाणे माझ्या मुलीचाही विवाह शाही पद्धतीने करू शकतो. पण संपत्तीचे असे आवडंबर माजवणे माझ्या बुद्धीला पटत नाही," असे ते म्हणाले. सध्या राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकारकडून शेतक-यांची कर्जमाफीच्या नावाखाली थट्टा केली जात आहे. बेरोजगारी वाढलेली आहे. राज्यातील जनतेची आर्थिक स्थिती चांगली नसताना आपण विवाह सोहळ्यांवर उधळपट्टी करणे योग्य नाही, असे सत्तार म्हणाले.

" हा सामुदायिक विवाह सोहळा स्वतः सत्तार यांनीच पुढाकार घेऊन आयोजित केला आहे. हा सामुदायिक सोहळा मुस्लिम जोडप्यांचा आहे. मात्र हिंदू जोडप्यांचाही सामुदायिक विवाह सोहळा आम्ही येत्या १ मे रोजी आयोजित केला आहे ", असे सत्तार यांनी सांगितले.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com