Mizoram Congress CM Lal Thanhavla defeated on both seats | Sarkarnama

मिझोरामचे मुख्यमंत्री  लाल ठनहवला दोन्ही जागांवर पराभूत 

सरकारनामा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

.

दिल्ली ः मिझोराम राज्य कॉंग्रेसच्या हातातून गेले आहे. मिझोरामचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले लाल  लाल ठनहवला   दोन ठिकाणांहून उभे होते पण मतदारांनी त्यांना दोन्ही ठिकाणी धूळ चारली आहे. 

लाल ठानवाला यांना चंफाई दक्षिण मतदारसंघात मिझो नॅशनल फ्रंटच्या उमेदवाराने पराभूत केले तर सेरछिप मतदारसंघात मिझोराम पीपल्स मूव्हमेंट पक्षाच्या उमेदवाराने त्यांना चारी मुंड्या चीत केले. 

लाल ठनहवला   2013 मध्ये मिझोरामचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले होते. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटने कॉंग्रेसचा पराभव केला आहे.

40 सदस्यांचा विधानसभेत मिझो नॅशनल फ्रंटचे उमेदवार 26 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपला फक्त एका जागेवर आघाडी आहे. भाजपने 40 पैकी 39 जागा लढवल्या होत्या हे उल्लेखनीय होय.

संबंधित लेख