mixed response for bandh in Akola | Sarkarnama

अकोल्यात बंदसाठी विरोधकांची एकजूट; पण संमिश्र प्रतिसाद

विवेक मेतकर
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

अकोला : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या बंदला सोमवारी (ता.१०)  अकोल्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

अकोला : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या बंदला सोमवारी (ता.१०)  अकोल्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने अवास्तव आणि अन्याय्य दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला आहे. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला तरीही बंदची व्यापकता वाढण्याएेवजी मोजक्या कार्यकर्त्यांसह निघालेल्या रॅलीने अकोलेकरांचे लक्ष तर वेधले. मात्र, बंद यशस्वी करण्यात मोठा प्रयत्न झाला नाही. 

सकाळपासून शाळा बंदचा संभ्रम

बंदमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असता. मात्र, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस प्रशासकीय सुटी आल्याने सोमवारच्या बंदच्या वेळी शाळा बंद ठेवण्याबाबत शाळा व्यवस्थापनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शहरातील बहुतांश शाळा सुरू असल्याने बंदचा प्रभाव दिसला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंप दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल-डिझेल डिलर, विक्रेते असोशिएनने घेतला होता. या बंदचा एसटीच्या सेवेवर परिणाम जाणवला नाही.

संबंधित लेख