miraj-suresh-khade-sanjay-patil-gopichand-padalkar | Sarkarnama

मंत्रिपदाआड काय आले, हेही समजले पाहिजे : आमदार सुरेश खाडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

मिरज : माझ्या मंत्रिपदाबाबत जे काही घडलं ते ते समजून घेण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळेच गोपीचंद पडळकरांच्या आरोपांची शहनिशा करावी लागेल, असे सांगत आमदार सुरेश खाडे यांनी खासदार संजय पाटील यांना डिवचले आहे. पडळकर यांच्याबाबत सहानभूती व्यक्त करताना त्यांनी पक्षासाठी खूप काम केले आहे. त्या पोटतिडकीतून ते बोलत आहेत. हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. 

शिवाजीराव नाईक आणि सुरेश खाडे यांची मंत्रीपदे खासदार संजय पाटील यांच्यामुळे गेली असा आरोप काल पडळकर यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाबाबत आज खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सावध भूमिका घेताना खासदार पाटील यांच्याविरोधात संशयाला वाव राहील अशी प्रतिक्रिया नोंदवली.

ते म्हणाले, "मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. हे मी कामातून सिद्ध केलेय. जिल्हा परिषद पंचायत समीती असो किंवा महापालिका या दोन्ही निवडणुकांमध्ये माझी क्षमता सगळ्यांना समजली आहे. मी माझं काम करीतच आहे. आता मुद्दा राहतो तो गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांचा. त्यांच्या आरोपाची शहानिशा करावीच लागेल. कारण माझ्याबाबत जे काही घडले, ते समजून घेण्याचा मला आधिकार आहे. त्यासाठी पडळकर पक्षात आहेत किंवा नाहीत हे महत्त्वाचे नाही. माझ्या मंत्रीपदाआड काय आले? पक्षश्रेष्ठींना माझ्यात नेमके काय कमी जाणवले, हे मला समजले पाहिजे. मंत्रीपद मिळाले नाही म्हणुन मी कुठेही थांबलेलो नाही. उलटपक्षी अधिक जोमाने काम करीत आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका या दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळाले. पडळकर आता पक्षात नसले तरी त्यांनी पक्षाला बरीच मदत केली आहे.''

संबंधित लेख