मिरा-भाईंदरमध्ये   बविआ, संघर्ष मोर्चा आणि  राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी 

Mira-Bhayandar
Mira-Bhayandar

भाईंदर  : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांना टक्कर देण्यासाठी नवी आघाडी तयार होत आहे. या आघाडीत बहुजन विकास आघाडी, मिरा-भाईंदर संघर्ष मोर्चा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा समावेश असेल. या आघाडीत कॉंग्रेसलाही सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. 


मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत सत्तारूढ भाजप आणि शिवसेना यांच्यातच अटीतटीची स्पर्धा सुरू असून शह-काटशह देण्याचा खेळ रंगात आला आहे. या दोन्ही प्रबळ पक्षांच्या विरोधात एकत्रितपणे सक्षम उमेदवार देण्यासाठी नवीन आघाडी आकारास येत आहे. या आघाडीत बविआ, मिरा-भाईंदर संघर्ष मोर्चा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा समावेश असे. 

याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, नारायण मानकर, उमेश नाईक आणि संघर्ष मोर्चाचे शिवमूर्ती नाईक, मीलन म्हात्रे यांच्यात रविवारी (ता. 23) सुमारे दोन तास चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजीव नाईक आणि बविआचे नेते राजीव पाटील यांचेही बोलणे झाल्याचे समजते. या आघाडीत कॉंग्रेसलाही घेण्याची सूचना ठाकूर यांनी केली आहे. संघर्ष मोर्चाचे प्रमुख आणि माजी नगरसेवक मीलन म्हात्रे हे आमचे नेते असतील, असे सांगून ठाकूर यांनी निवडणुकीसाठी एक चांगला चेहरा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. 

"सक्षम पर्याय ठरू' 
एकत्र येऊन एक सक्षम पर्याय नागरिकांना देण्याबाबत एकमत झाले आहे. या आघाडीत कॉंग्रेस सामील होणार का, याचे उत्तर दोन दिवसांत मिळेल, असे बविआचे नेते नारायण मानकर यांनी  सांगितले. शिवसेना आणि भाजपच्या उधळलेल्या वारूला लगाम घालण्याची क्षमता या आघाडीत असेल. अन्य समविचारी पक्षांसाठीही आघाडीची दारे खुली आहेत, असे ते म्हणाले. नव्या आघाडीत अनेक इच्छुक उमेदवार दाखल होणार असून शिवसेना आणि भाजपमधील उमेदवारी मिळण्याची शक्‍यता नसलेले नेते आघाडीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आघाडी लवकरच एक वेगळ्या वळणावर असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com