mira bhaindra election, | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मीरा भाईंदरमध्ये भाजप- शिवसेनेमध्येच 'काटो की टक्कर 

sarkarnama
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुंबई : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी (रविवारी) मतदानाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. भाजप आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांमध्येच "काटो की टक्कर' असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात भाजप आमदार नरेन्द्र मेहता यांच्या एकहाती कारभाराला सुरुंग लावण्याचा प्रयत्न शिवसेनेसह कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून केला जात आहे. शिवसेनेने ही निवडणूक मात्र प्रतिष्ठेची केली आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी एकूण 509 उमेदवर रिंगणात आहेत. जैन, गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी 5 लाख 93 हजार 345 मतदार आहे. यावेळी सत्ता राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या एकाधिकारशाहीमुळे बंडखोरी, पक्षांतर्गत कुरघोडी मतदारापर्यंत पोहचल्या आहेत. त्यातून भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेनेही प्रचारात जोर लावला.

 या निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, बहुजन विकास आघाडी, स्थानिक आघाडी असे विविध पक्ष उतरले असले तरी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये सत्तेसाठी लढाई आहे. 

या निवडणुकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारकाईने लक्ष दिले असले तरी भाजपची धुरा आमदार नरेंद्र मेहता आणि प्रभारी नेते व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर होती. दुसरीकडे शिवसेनेने भाजपला सत्तेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही, अशी व्यूहरचना केली. 
 
संबंधित लेख