mira bhaindar elction | Sarkarnama

मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मुंबई : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपाकडून देण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये इतर पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समोर आले आहे. भाजपाने या निवडणुकीत दिलेल्या 93 उमेदवारांपैकी 25 म्हणजेच तब्बल 27 टक्के उमेदवारावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर यात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या भाजपाचे 18 उमेदवार असल्याची माहिती या उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. 

गुन्ह्याची नोंद आणि गंभीर गुन्हे असलेल्या उमेदवारांमध्ये भाजपाखालोखाल शिवसेनेचे आहेत. त्यांच्या 92 पैकी 18 म्हणजेच 20 टक्के उमेदवारांवर विविधप्रकारच्या गुन्ह्याची नोंद असून त्यात 13 जणांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे, त्या खालोखाल कॉंग्रेसच्या 74 पैकी 10, राष्ट्रवादीच्या 63 पैकी 9, बहुजन विकास आघाडीच्या 27 पैकी 3, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 24 पैकी 2 जणांवरही वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. 

मीरा-भाईंदर महापालिकेच्या 24 प्रभागाच्या 95 जागांसाठी 20 ऑगस्ट रोजी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी 509 उमेदवार विविध प्रभागातून रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी अनेक उमेदवारांवर कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्या सोबतच 506 पैकी 209 उमेदवार हे करोडपती असून त्यातही भाजपच्या 93 पैकी 63 उमेदवार करोडपती आहेत. तर शिवसेनेचे 58, कॉंग्रेसचे 40, राष्ट्रवादीचे 63, बहुजन विकास आघाडी आणि मनसेचे प्रत्येकी 5 उमेदवारही करोडपती आहेत. 21 उमेदवारांकडे 3 लाखापेक्षाही कमी मालमत्ता आहे. 

संबंधित लेख