राज्यात अल्पसंख्याक समाजाला हव्यात लोकसभेच्या चार जागा

राज्यात अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या तेरा टक्के आहे. हा समाज सातत्याने कॉंग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. राज्यातील लोकसभा मतदारसंघांत आतापर्यंत एकही अल्पसंख्याक उमेदवार पक्षाने सुचविलेला नाही. त्यामुळे धुळ्यासह चार मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी महापौर रशीद शेख यांनी केली आहे.
राज्यात अल्पसंख्याक समाजाला हव्यात लोकसभेच्या चार जागा

मालेगाव  : राज्यात अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या तेरा टक्के आहे. हा समाज सातत्याने कॉंग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. राज्यातील लोकसभा मतदारसंघांत आतापर्यंत एकही अल्पसंख्याक उमेदवार पक्षाने सुचविलेला नाही. त्यामुळे धुळ्यासह चार मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी महापौर रशीद शेख यांनी केली आहे.

महापौर शेख म्हणाले, ''धुळे लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाजबांधवांची मतदार संख्या पाच लाखापेक्षा अधिक आहे. गेल्या निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसला लाख हजार मते मिळाली होती. तत्पुर्वी झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत हाच मतदारसंघ कॉंग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. पक्षाने या सर्व बाबींचा विचार करुन धुळे लोकसभा मतदारसंघातून मुस्लीम समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी. यापुर्वी आपण मराठा समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे. पक्षाने राज्यातील मुस्लीम समाजातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे करणे अत्यावश्‍यक आहे."

"राज्यातील धुळे, बांद्रा-मुंबई, भिवंडी, अकोला, औरंगाबाद, परभणी यांसह अनेक मतदारसंघ मुस्लीमबहुल आहेत. यापैकी चार जागांवर अल्पसंख्याक मुस्लीम उमेदवारांना संधी द्यावी. कॉंग्रेसचे धुळे व नाशिक जिल्हाध्यक्षांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पक्षाध्यक्ष राहुल गांधी, लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आदींसह संबंधितांना याबाबत माहिती देण्यात आली आहे." बहुजन वंचित आघाडीने येथील उमेदवाराला संधी दिली असली तरी कॉंग्रेसवर त्याचा फारसा परिणाम होणार असे शेख म्हणाले. पक्षाने संधी दिल्यास उमेदवारी करु असे त्यांनी सांगितले. यावेळी अनिस अजहर, साबीर गोहर, सलीम अप्सरा, नगरसेवक अस्लम अन्सारी, शकील बेग, जमील क्रांती, नसीम अहमद आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com