Ministers will lose more facilities | Sarkarnama

लाल दिव्यानंतर आणखी संकट !

सरकारनामा वृत्त 
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

 लाल दिवा गेल्यानंतर आता अशी पाऊले उचलणार आहोत की ""मंत्रीपद नको, पक्षाचे काम करतो'' असे मंत्रीच म्हणतील, असे दानवे म्हणाले. त्यामुळे मंत्र्यांची कुठली सुविधा आता काढून घेतली जाणार याची चर्चा व्यासपीठावरील मंत्र्यांसह सर्व उपस्थितांत सुरु झाली. 

पुणे : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे दोन दिवसाचे अधिवेशन नुकतेच चिंचवड येथे झाले. त्याला केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातीलच अनेक मंत्री उपस्थित होते. मात्र, एकही लाव दिवा दिसला नाही.

अपवादात्मक मोटारीवर राहिलेला झाकलेला होता.त्यामुळे एरव्ही लाल दिव्यांनी झगमगून जाणारा हा कार्यक्रम त्याविना झाकोळलेला दिसला.

या अधिवेशनाला येताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांच्या मोटारीला अपघात झाला होता.त्यामुळे पहिल्या दिवशी ते विशेष बोलले नाहीत. मात्र, समारोप होताना त्यांनी तुफान टोलेबाजी केली.

अर्थात लाल दिव्याचा विषयही त्यांच्या या भाषणात निघाला. एरव्ही टोलनाक्‍यावरून सुसाट जाणाऱ्या मंत्र्यांच्या मोटारींना आता तेथे थांबावे लागत आहे. एवढेच नाही,तर लाल दिवा नसल्याने टोल न भरणाऱ्या मोटारचालकाला टोल आकारणी कर्मचारी आत कोण आहे अशी विचारणाही करीत आहे,असे सांगत लाल दिवा गेल्यामुळे सध्या मंत्र्यांना वाईट दिवस आल्याचे दानवे यांनी सांगताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

तसेच लाल दिवा गेल्यानंतर आता अशी पाऊले उचलणार आहोत की ""मंत्रीपद नको, पक्षाचे काम करतो'' असे मंत्रीच म्हणतील, असे दानवे म्हणाले. त्यामुळे मंत्र्यांची कुठली सुविधा आता काढून घेतली जाणार याची चर्चा व्यासपीठावरील मंत्र्यांसह सर्व उपस्थितांत सुरु झाली. 

संबंधित लेख