ministers shindes bodyguard | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मंत्री राम शिंदे यांच्या सुरक्षा रक्षकाकडून महिलेवर अत्याचार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 जुलै 2017

नगर : तरुणीवर बलत्कार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश रामदास अकोलकर असे त्याचे नाव आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. 

नगर : तरुणीवर बलत्कार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश रामदास अकोलकर असे त्याचे नाव आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. 

अकोलकर विवाहित आहे. संबंधित तरुणी शिक्षणासाठी नगरला आली होती. गेल्या सहा महिन्यांपासून अकोलकर तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. याबाबत संबंधित तरुणीने पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे तिने पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत कैफियत मांडली. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोलकर सध्या फरार आहे. 

संबंधित लेख