ministers pa advice political lesson | Sarkarnama

मंत्र्याचे खासगी सचिव "राजकीय शाळा' घेतात तेंव्हा..! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

मुंबई : आगामी निवडणूकांत प्रचाराची रणनिती कशी असावी याबाबत मंत्री, पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांनी राजकीय धडे दिले तर आश्‍चर्य नाही. पण, सरकारी सेवेतील उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी सध्या मंत्र्याचे खासगी सचिव असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांने असे धडे देणं हा नवा पायंडा मंत्रालयात पडतोय की काय अशी जोरदार चर्चा रंगली आहे. 

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खासगी सचिवांनी नुकतीच अशी "शाळा' घेत मंत्री, राज्यमंत्री, विविध विभागाचे प्रधान सचिव व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सिंचनाच्या प्रगतीचे "धडे' दिले. 

कथित सिंचन घोटाळ्याच्या आरोपाने आघाडी सरकारला ऐन निवडणूकीच्या काळात घेरले होते. मात्र चार वर्षानंतर या आरोपांची चौकशी सुरू असताना आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाची अधोगती कशी झाली याचे सादरीकरणच या खासगी सचिवांनी केले. 2014 मधील जलसंपदा विभाग व 2018 मधील महत्वाकांक्षी बदल याची तुलना करत या खासगी सचिवांनी कौतुकाचे पाढे वाचले. 

आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावर कशाप्रकारे वारेमाप खर्च केला. हा खर्च कशाप्रकारे अनाठायी होता. त्यातून महाराष्ट्राचे नुकसान कसे झाले. याची माहीती देत खासगी सचिवांनी जलसंपदा, वित्त, नियोजन विभागाच्या अतिरिक्‍त मुख्य सचिवांसमोर "भाषण' केल्याची जोरदार चर्चा अधिकारी वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे देखील शांतपणे खासगी सचिवांचे हे "व्याख्यान' ऐकण्यात मग्न झाले होते. या बैठकीत सर्व तांत्रिक बाजूची सखोल माहीती व अनुभव असलेले जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता उपस्थित होते. 

तसेच निधी वाटपाची काटेकोर व कायदेशिर अंमलबजावणी करणारे वित्त विभागाचे सनदी अधिकारी देखील उपस्थित होते. एखाद्‌या ज्युनियर अधिकाऱ्याने तेही सिंचन प्रकल्पातल्या तांत्रिक बाबींचा अुनभव नसताना अशा प्रकारे या सर्व अधिकाऱ्यांना राजकिय शैलीत "शहाणपण' शिकवणे यावरून अधिकारी अचंबित झाले आहेत. "सत्तेपुढं शहाणपण चालत नाही', अशी भावना अधिकारी खासगीत व्यक्‍त करत आहेत. 

संबंधित लेख