सर्व मंत्री प्रचारात मंत्रालयात अभ्यागत डाराडूर !

पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकित अख्खे मंत्रिमंडळ व्यस्त असल्यामुळे सध्या एकही मंत्री मंत्रालयात फिरकत नाही .
Mantralay-or-retiring-room
Mantralay-or-retiring-room

मुंबई  : पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकित अख्खे मंत्रिमंडळ व्यस्त असल्यामुळे सध्या एकही मंत्री मंत्रालयात फिरकत नाही .

त्यामुळे कामानिमित्त आलेल्या अभ्यागताना हेलपाटे मारावे लागत आहेत . मंत्री महोदय भेटत नाहीत आणि कामही होत नाही म्हणून  दमलेल्या एका अभ्यागताने  मंत्रालयात बाकावर आज अशी ताणून दिली . 

दोन्ही पोटनिवडणुकीत शिवसेना भाजप स्वतंत्र लढत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची केली की गेला आठवडाभर ते दोन्ही मतदारसंघात व्यस्त होते.

त्यांच्या दिमतीला भाजपचे मंत्री तर उद्धव ठाकरे यांच्या सोबतीला शिवसेनेचे मंत्री पायाला भिंगरी लावून पळत होते. परिणामी गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. इतर दिवशीही कुणी मंत्री मंत्रालयात फिरकले  नाहीत .

 मंत्री नसल्यावर मंत्रालयातील बाबूशाही कोणाला जुमानते ? त्यामुळे कामानिमित्ताने येणाऱ्या लोकांचा संताप झाला. 

एकतर बाहेर ऊन मी म्हणत होते आणि मंत्र्याची दालने ओस पडलेली. काही लोक रागाने परत जात होती, तर काहींनी मध्यवर्ती वातानुकूलित असलेल्या मुख्य इमारतीच्या  व्हरांड्यात सोफ्यावर अश्या  डाराडूर झोपा काढल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com