minister subhash deshmukh about madha loksabha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

'माढा' माझ्यासाठी नवा नाही आणि लोकांसाठी मी नवा नाही!

 संपत मोरे
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विरोधात देशमुख यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता ते पुन्हा रिंगणात उतरतील का?याचीच चर्चा देशमुख यांच्या दौऱ्यानंतर सुरु झाली आहे.

पुणे : "माण खटावचा दौरा केला याचा अर्थ मी माढा मतदारसंघातून इच्छूक आहे असा नाही, मात्र पक्षाने सांगितले तर लढायला मागेपुढेही बघणार नाही. कारण हा मतदारसंघ माझ्यासाठी नवा नाही किंवा मी इथल्या लोकांसाठी नवा नाही."असे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

माढ्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी मिळावी अशी मागणी निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार दिपक साळुंखे यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उमेदवारीवरून चुरस सुरु झाली असतानाच सुभाष देशमुख यांनी या मतदारसंघाचा दौरा करत 'आदेश दिला तर लढू'या म्हणण्याला खूप अर्थ आहे.

मंत्री देशमुख यांनी माण, खटाव, फलटण या तालुक्यांचा काल दौरा केला. या दौऱ्याबाबत भाष्य करताना"मी दौरा केला याचा अर्थ मी निवडणूक लढवेन असा नाही पण पार्टीने सांगितले तर मी लढेन."असं सांगितले आहे.

 

संबंधित लेख