minister ravindra chavan multiflex food issue | Sarkarnama

मंत्री रवींद्र चव्हाणांच्या अतिउत्साहपणामुळे सरकारची कोंडी 

प्रशांत बारसिंग
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अतिउत्साहापणामुळे राज्याच्या मल्टीप्लेक्‍समध्ये बाहेरुन खाद्यपदार्थ न्यायचे किंवा नाहीत आणि तेथील पदार्थांच्या अव्वाच्या सव्वा किमतीवरून सुरु झालेल्या वादात राज्यसरकारची कोंडी झाली आहे. 

मुंबई : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अतिउत्साहापणामुळे राज्याच्या मल्टीप्लेक्‍समध्ये बाहेरुन खाद्यपदार्थ न्यायचे किंवा नाहीत आणि तेथील पदार्थांच्या अव्वाच्या सव्वा किमतीवरून सुरु झालेल्या वादात राज्यसरकारची कोंडी झाली आहे. 

खाद्यपदार्थाच्या मुद्यावर राज्याच्या मल्टीप्लेक्‍स थिएटर मध्ये आंदोलने सुरु झाली असून हा विषय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात नागपुर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात एका आमदारांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. ज्या दिवशी या लक्षवेधी सूचनेवर सभागृहात चर्चा होणार होती. तेव्हा साधु वासवानी यांचे निधन झाल्याने अन्न व नागरी पुरवठा व अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट पुण्याला निघुन गेले, त्यामुळे मंत्री चव्हाण यांनी सभागृहात उत्तर दिले. 

हा विषय अन्न व नागरी पुरवठा आणि गृह विभागाशी संबंधित असताना चव्हाण यांनी गृह खात्याचे अधिकार नसताना मोठ्या उत्साहात घोषणा करून टाकली तसेच बाहेर टीव्ही चॅलनाही बाइट दिला. 

चव्हाण यांच्या घोषणेमुळे मल्टीप्लेक्‍स मध्ये जाणारे आनंदी झाले, मात्र कायद्याच्या कक्षेत हा विषय अडकल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले. चव्हाण यांनी उत्तर देताना संयम राखला असता तर सरकार तोंडघशी पडले नसते, अशी माहिती एका मंत्र्याने दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख