minister raval promotes sarangkheda festival | Sarkarnama

मंत्री जयकुमार रावल यांचे दुबईत घोडाबाजाराचे मार्केटिंग!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई : संयुक्त अरब अमिरातीचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशीद अल मक्ततौम यांना सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाला येण्याचे निमंत्रण राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

नुकतीच शेख हमदान आणि मंत्री श्री. रावल यांची दुबईत भेट झाली. यावेळी 400 वर्षाची परंपरा असलेल्या सारंगखेडा घोडे बाजार, यात्रेची माहिती ऐकून राजकुमार शेख प्रभावित झाले.

गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमच्या वतीने दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्फरन्स 'महाबिझ 2018' चे उद्घाटन मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला आलेल्या शेख हमदान यांचे रावल यांनी स्वागत केले.

अरब नागरिकांना घोड्यांबद्दल विशेष प्रेम आणि आकर्षण आहे. महागडे, देखणे, रुबाबदार घोडे बाळगणे हा अरब लोकांचा छंद समजला जातो.  हाच संदर्भ घेऊन मंत्री श्री. रावल यांनी या भेटीत शेख यांना 400 वर्षाची परंपरा असलेल्या सारंगखेडा घोडेबाजार, यात्रेची माहिती सांगितली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर राजकुमार शेख प्रभावित झाले. सारंगखेड्याची यात्रा आणि तिथे आलेले घोडे पाहायला येण्याचा आपण नक्की प्रयत्न करू, असे राजकुमार शेख यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनस्थळ आणि व्यापार केंद्र म्हणून दुबईला जगात आघाडीवर आणणाऱ्या दुबई वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिलाल सैद अल मरी हेही यावेळी उपस्थित होते.

12 डिसेंबरपासून सारंगखेड्यात होणार महोत्सव

सारंगखेडा (जि. नंदुरबार) येथे येत्या 12 डिसेंबर 2018 ते 8 जानेवारी 2019 दरम्यान  हा महोत्सव होणार आहे.  एमटीडीसी आणि चेतक महोत्सव समितीच्या एकत्रित सहभागातून दरवर्षी होणाऱ्या चेतक महोत्सवास देश-विदेशातील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी या महोत्सवास सुमारे 16 लाख पर्यटकांनी भेट दिली. देशाच्या आणि जगाच्या विविध भागातील 2700 घोडे मागील वर्षी या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीसाठी दाखल झाले होते. यावर्षीही महोत्सवाचे दर्जेदार आयोजन करण्यात येत असून यंदा अंदाजे 20 लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे

संबंधित लेख