तुमचा बंड्या 2-2 हजार घेतो; त्यावेळी झोपा काढता का? : रामदास कदम

माझ्यावर मेहरबानी करताय कां?
तुमचा बंड्या 2-2 हजार घेतो; त्यावेळी झोपा काढता का? : रामदास कदम

पुणे: राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज शिर्डी दौऱ्यात प्लॅस्टिक बंदीवरुन जोरात झापाझापी केली. बंड्या नावाचा कर्मचारी 2-2 हजार गोळा करतो, त्यावेळी तुम्ही झोपा काढता कां, असा सवाल मंत्री कदम यांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी केला.

कदम दर्शनानंतर निघाले असताना त्यांनी मुख्याधिकारी दिघे यांना सर्रास प्लॅस्टिक दिसत असल्याचे सांगितले. यासंबंधात मुख्यमंत्र्यांशी बोलून तुमच्यावर कारवाई करु, असे कदम रागात म्हणाले. त्यावर संबंधित दुकानदारांवर कारवाई केल्याचे दिघेंनी सांगताच मंत्री कदम आणखी भडकले. माझ्यावर मेहरबानी करताय कां? 100 टक्‍के कारवाई झाली पाहिजे, तुमचा बंड्या दोन दोन हजार घेतो, याची मला माहिती आहे. सर्वत्र बोर्ड लावा, कारवाई करा. साई संस्थान प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी करत नसेल तर संस्थानवरही कारवाई होईल, असे कदम म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com