minister ram shinde on jalyukta shivar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

जलयुक्त शिवार योजनेवर टीका ही राज्यातील शेतकऱ्यांचा अपमान : राम शिंदे 

उमेश घोंगडे 
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे : 'जलयुक्त शिवार'मुळे ज्या भागात पाऊस झाला त्या ठिकाणी शिवारात पाणी वाढले आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेवर सरसकट टीका करणे म्हणजे यासाठी काम करणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा अपमान आहे, असा पलटवार जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज पुण्यात केला. 

जलयुक्त शिवार योजनेवर विरोधकांकडून टीका होत असताना शिंदे यांच्याकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांना जोरदार उत्तर देण्यात आले आहे. 

भूजल पातळी मोजण्याची सध्याची पद्धत 'आऊटडेटेड' झाल्याचे त्यांनी नमूद केले. सत्तेच्या काळात हजारो कोटी रूपये खर्च करूनही राज्याच्या सिंचनात वाढ झालेली नाही. हे यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या योजनेवर कॉंग्रेसकडून अगदी पोरकटपणे टीका केली जात आहे. जलसंधारणबद्दल काहीही माहिती नसलेले लोक सरकारवर टीका करीत असून राज्याच्या भौगोलिक स्थिती विरोधकांनी समजावून घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती व जयलयुक्त शिवार योजनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत टीका केली होती. याला उत्तर देताना शिंदे यांनी विरोधकांना राज्यातील परिस्थितीची नेमकी माहिती नसल्याचे सांगितले. केवळ विरोधाला विरोध म्हणून राज्याच्या दृष्टीकोनातून चांगल्या योजनेवर विरोधक टीका करीत आहे. यामुळे या कामात सक्रिय असलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे सध्याची भूजल पातळी मोजण्याची पद्धती 'आऊडेटेड' झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र योग्य पद्धती कोणती हे मात्र ते सांगू शकले नाहीत. 
 
संबंधित लेख