Minister Kadam and MLA Jaleel"s friendship talk of town | Sarkarnama

कदम-जलील मैत्रीचे गुढ

जगदीश पानसरे
मंगळवार, 2 मे 2017

जिल्हा नियोजन समितीच्या
बैठकीत देखील कदमांनी जलील यांच्या मतदारसंघातील कामासाठी भरघोस निधी देत दोस्ती निभावल्याचे दिसून आले.

औरंगाबाद:  :पर्यावरणमंत्री रामदास कदम व एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यातील घट्ट मैत्रीचा विषय शहरातील राजकारणात मोठ्या चवीने चर्चीला जातो.

 कधीनव्हे ते औरंगाबादच्या इतिहासात कटकट गेट सारख्या भागात रस्ता रुंदीकरणासाठी पालकमंत्र्याच्या उपस्थिती भूसंपादन करण्यात आले होते. त्यावेळी पहिल्यांदा मुस्लिम बहुल भागात रामदास कदम व शिवसेनेचे बॅनर लागले होते. या मागे आमदार इम्तियाज जलील यांचाच पुढाकार होता.तेव्हा पासून कदम-जलील यांच्यात मैत्री झाली. जिल्हा नियोजन समितीच्या
बैठकीत देखील कदमांनी जलील यांच्या मतदारसंघातील कामासाठी भरघोस निधी देत दोस्ती निभावल्याचे दिसून आले. त्यामुळे रामदास कदम औरंगाबादेत आले की इम्तियाज जलील नेहमीच त्यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत असतात.पोलीसांसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या वसाहतीची जागा पाहण्यासाठी कदम
आले, तेव्हा देखील जलील त्यांच्या पाठीशी उभे होते.

कदमांच्या कारमध्ये खैरे !

राज्याचे पर्यावरण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम आणिशिवसेनेचे खासदार तथा उपनेते चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय संबंधकिती मधुर आहेत हे सर्वश्रुतच आहे.  शिवसेनेतील खैरे विरोधकांना बळ पुरवत कदमांनी कोकणी बाणा दाखवल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त शहरात आलेल्या रामदास कदमांनी पोलीस
कर्मचाऱ्यांची वसाहत उभी राहत असलेली जागा पाहून प्रस्ताव द्या निधी मंजूर करून देतो अशी घोषणा यावेळी केली. तिथून निघतांना कदमांच्या गाडीत खासदार खैरेही बसले. कदमांच्या कारमध्ये बसलेल्या खैरेंना पाहून उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

संबंधित लेख