Minister Gulabrao Deshmukh travels by ST Bus | Sarkarnama

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांचा  एस.टी. प्रवास 

सरकारनामा
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

***

जळगाव  : मंत्री व आमदारांना एस.टी.चा प्रवास मोफत आहे, पण हल्लीच्या युगात त्याचा फारसा नव्हे तर वापरच होत नाही. परंतु एस.टी.च्या चालक, वाहक तसेच प्रवशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे उपनेते व राज्याचे सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चक्क एस.टी.तून प्रवास केला. 

राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज एस.टी.सह विविध विभागाची आढावा बैठक घेण्याचे निश्‍चित केले आहे. एस.टी.विभागाच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी पाळधी ते जळगाव असा एस.टी.तून प्रवास केला. यावेळी त्यांनी वाहकांशी तसेच प्रवाशांशी चर्चा केली. तसेच जळगाव एस.टी.बसस्थानकात जावून सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख