mim wins three seat in jalgaon | Sarkarnama

MIM चे 3 नगरसेवक : ओवैसींची सभा जळगावात हिट, सांगलीत फेल! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे: महापालिका निवडणुकीत एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जळगाव व सांगलीत सभा घेतल्या होत्या. त्या सभांना मोठी गर्दी झाली होती. 

ओवैसींच्या सभेचे फळ जळगावात मिळाले. तिथे 3 नगरसेवक निवडून आले आहेत. मिरजमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. ओवैसी यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. तर आमदार इम्तीयाज जलील यांनी मिरजमध्ये औरंगाबादसारखे वातावरण असल्याचा दावा केला होता, मात्र त्यांना यश आले नाही. एमआयएमला आशा असलेल्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख