MIM MLa Imtiaj Jaleel | Sarkarnama

आणि  आमदार इम्तियाज जलील हातात काठी घेऊन उतरले ...

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

जिल्ह्यातील लिंबेजळगाव येथे 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ महाराष्ट्रच नाही तर बाहरेच्या राज्यांतून या इज्तेमासाठी मुस्लिम बांधव आले होते . 

औरंगाबाद :  जिल्ह्यातील लिंबेजळगाव येथे 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ महाराष्ट्रच नाही तर बाहरेच्या राज्यांतून या इज्तेमासाठी मुस्लिम बांधव आले होते . अचानक इतकी माणसे आल्याने वाहतुकीवर ताण पडला . मात्र वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आमदार इम्तियाज जलील स्वतः रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले . 

लाखोंच्या गर्दीत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या इज्तेमाचा समारोप सोमवारी झाला. त्यानंतर आपापल्या भागात पोचण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लिंबेजळगाव येथून निघालेल्या वाहनांना स्वयंसेवका सोबतच मध्य विधानसभा मतदरासंघाचे आमदार इम्तियाज जलील यांनी देखील मार्ग मोकळा करून देण्यासाठी मदत केली.

लिंबेजळगांव येथील राज्यस्तरीय इज्तेमा लाखोंची गर्दी आणि उत्कृष्ट नियोजनामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. देशभरातून या इज्तेमासाठी 22 फेब्रुवारीपासूनच मुस्लिम बांधवांची गर्दी लिंबेजळगावात व्हायला सुरूवात झाली होती. लाखोंची होणारी गर्दी, त्याद्वारे शहरात येणारी हजारो वाहने यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी आयोजकांनी घेतली होती.

सोमवारी दुपारच्या प्रार्थनेनंतर इज्तेमाचा समारोप झाला आणि लाखोंची गर्दी परतीच्या मार्गावर निघाली. यावेळी इज्तेमासाठी हजर असलेले आमदार इम्तियाज जलील यांनी स्वयंसेवकांच्या सोबत रस्त्यावर उभे राहून जाणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यास मदत केली. हातात काठी घेऊन ते वाहनांनी दिशा दाखवत होते.

विशेष म्हणजे राज्यस्तरीय इज्तेमाच्या पुर्वतयारीची पाहणी करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री बनबराव लोणीकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय सिरसाट कॉंग्रेसचे आमदार सुभाष झाबंड आदींसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लिंबेजळगावला भेट दिली होती.

संबंधित लेख