MIM - Congress clash in Malegaon | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजिनामा
अहमदनगर निकाल - भाजप - 14, शिवसेना - 22, राष्ट्रवादी - 20, कॉंग्रेस - 5, बसप - 4, सपा - 1, अपक्ष - 2
मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्ट परिसरात हल्ला
ब्रम्हपुरी नगरपरिषद- नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. रिताताई दीपक उराडे यांचा ८०२० मतांनी विजय
रिसोड नगरपरिषद - नगराध्यक्ष पदी जन विकास आघाडीच्या विजयमाला आसनकर विजयी
लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 13 जागी भाजप विजयी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार विजयी, काँग्रेस चार जागी विजयी

एमआयएम - कॉंग्रेसमध्ये वादाची ठिणगी 

संपत देवगिरे: सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 एप्रिल 2017

सभा पार पडल्यानंतर आझादनगर भागातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये एमआयएम समर्थक कार्यकर्त्याला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरकोळ वादातून मारहाण केली. या वादात हॉटेलमधील साहित्य अस्ताव्यस्त झाले. याबाबत माहिती मिळताच एमआयएमचे  अध्यक्ष अब्दुल मलीक व त्यांचे समर्थक तक्रार देण्यासाठी पवारवाडी पोलिस ठाण्यात गेले.

मालेगाव, ता. 29 : महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मनपा प्रचाराची पहिली मोठी जाहीर सभा एमआयएमतर्फे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची झाली. मात्र या सभेचा संदेश मतदारांत पोोहचण्याआधी एमआयएम आणि काॅंग्रेसमधील बाचाबाचीच्या बातम्यांची चर्चा पोहोचली. त्यामुळे सभेपेक्षा वेगळीच चर्चा रंगली.
 
एमआयएम मालेगाव महापालिका निवडणूकीत उमेदवारांच्या प्रचारात अधिक जोष आणण्यासाठी  आक्रमक प्रचारावर भऱ देत आहे. त्यासाठी नुकतीच त्यांची सभा झाली. सभा पार पडल्यानंतर आझादनगर भागातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये एमआयएम समर्थक कार्यकर्त्याला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरकोळ वादातून मारहाण केली. या वादात हॉटेलमधील साहित्य अस्ताव्यस्त झाले.

याबाबत माहिती मिळताच एमआयएमचे  अध्यक्ष अब्दुल मलीक व त्यांचे समर्थक तक्रार देण्यासाठी पवारवाडी पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप करीत मलीक यांनी अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर मध्यरात्रीच ठिय्या आंदोलन सुरु केले.

आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली आहे. वाद वाढल्यास सतत धुसफूस सुरु राहील. निवडणुका शांततेत  व्हायला हव्यात. काहीजण जाणीवपुर्वक वाद निर्माण करीत आहेत. असे समजुतीचे बोल पोलिस, सामाजिक कार्यकर्ते व एमआयएम समर्थकांनी सांगितले. यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास मलिक यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

जमावबंदी आदेश लागू असल्याने आंदोलनासाठी ते एकटेच अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर बसले होते. शहर पोलिस ठाणे आवारात मोठा जमाव जमला होता. यानंतर दोघा समर्थकांमध्ये समजोता झाला. वाद आपसात मिटल्याने अनर्थ टळला.

मुळात ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली तो नेमका कोणत्या पक्षाचा हे अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिले. हा कार्यकर्ता प्रत्यक्षात ना कॉंग्रेसचा ना एमआयएमचा होता. यामुळे निवडणुकीत "पराचा कावळा होवू शकतो' याचा प्रत्यय आला.

संबंधित लेख