mim and aurangabad | Sarkarnama

औरंगाबाद पूर्वमधून "एमआयएम'च्या डॉ. गफ्फार कादरी यांनी घोषित केली स्वतःचीच उमेदवारी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्यावतीने नुकत्याच शहरवासियांना दिवाळी शुभेच्छा देण्यात आल्या. यातून एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्वमधून आपल्याच नावाची उमेदवार म्हणून जाहिरातबाजी सुरू केली आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उमेदवारी जाहीर करण्याचे अधिकार कादरी यांच्याकडे सोपवले की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्यावतीने नुकत्याच शहरवासियांना दिवाळी शुभेच्छा देण्यात आल्या. यातून एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्वमधून आपल्याच नावाची उमेदवार म्हणून जाहिरातबाजी सुरू केली आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उमेदवारी जाहीर करण्याचे अधिकार कादरी यांच्याकडे सोपवले की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील पूर्व, पश्‍चिम आणि मध्य या तिन्ही मतदारसंघात एमआयएमने जोरदार मुसंडी मारली होती. मध्यमधून विजय मिळवत इम्तियाज जलील आमदार झाले, तर पूर्वमध्ये एमआयएमचे डॉ.गफ्फार कादरी यांचा थोडक्‍यात पराभव झाला होता. पश्‍चिम मतदारघातून एमआयएम पुरस्कृत गंगाधर गाडे यांनीही लक्षवेधी मते त्यावेळी घेतली होती. 

गेल्यावेळी फक्त 4,200 मतांनी झालेला पराभव तेव्हा एमआयएम आणि डॉ. गफ्फार कादरी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. पण येत्या निवडणुकीत हे पराभवाचे अंतर कमी करत विधानसभा गाठण्याचा चंगच कादरी यांनी बांधला आहे. शहराच्या काही भागात उसळलेली जातीय दंगल आणि त्यातील सहभागावरून पोलिसांनी एमआयएमच्या काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यापैकी फिरोज खान एक होते, त्यामुळे पूर्व विधानभा मतदारसंघातून फिरोज खान यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली होती. पण कुठल्याही परिस्थिती आपले नाव मागे पडणार नाही याची काळजी गफ्फार कादरी हे सुरूवातीपासूनच घेतांना दिसत आहेत. 

ओवेसी यांच्याशी थेट संपर्क ही जमेची बाजू 
डॉ. गफ्फार कादरी यांचा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याशी थेट संपर्क आहे. गेल्या निवडणुकीत अगदीच थोड्या मताने पराभव झाल्यामुळे पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा त्यांचा दावा आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी सोबत एमआयएम गेल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपला विजय पक्का असल्याचे कादरी समर्थक छातीठोकपणे सांगतांना दिसतात. 

दोन ऑक्‍टोबर रोजी वंचित आघाडी एमआयएमच्या संयुक्त जाहीर सभेत देखील आमदार इम्तियाज जलील यांच्या सोबत डॉ. गफ्फार कादरी यांना भाषणाची संधी देण्यात आली होती. यावरून पूर्वमधून पुन्हा डॉ. गफ्फार कादरी यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते. हे जरी खरे असले तरी पूर्व विधानसभेचे उमेदवार असा उल्लेख आपल्या फेसबुक पेज, लेटरपॅड, व्हिजीटींग कार्ड आणि पक्षाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शुभेच्छा जाहीरातींमधून करणे कादरी यांच्यासाठी अतिघाईचे ठरू शकते असे बोलले जाते. 

 

संबंधित लेख