"एक देश, एक निवडणूक' कॉंग्रेसचा विरोध तर मिलिंद देवरांचे समर्थन ! 

"एक देश, एक निवडणूक' कॉंग्रेसचा विरोध तर मिलिंद देवरांचे समर्थन ! 

मुंबई : "एक देश, एक निवडणू' ला कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला असताना इकडे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल यांचे विश्वासू सहकारी मिंलिंद देवरा यांनी मात्र समर्थन केल्याने कॉंग्रेसमध्येच आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

देशात सध्या एक देश एक निवडणूक या विषयावरुन चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीला बहुतांश विरोधी पक्षातील नेत्यांनी बहिष्कार घातला होता. कॉंग्रेसनेही एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला विरोध केला असताना देवरा यांनी "एक देश, एक निवडणूक' समर्थन केलं आहे त्यामुळे या मुद्द्यावरुन कॉंग्रेसमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे. 

दरम्यान, एक देश, एक निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक समिती स्थापन करणार असून ही समिती याबाबत अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. याबाबत काही पक्षांचा विरोध आहे. वैचारिक मतभेद आहेत पण, सरकार या मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहे. काही पक्ष सोडले तर बहुंताशी पक्ष एक देश एक निवडणूक साठी तयार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com