बाबासाहेबांना अभिवाद करण्यास लाखोंचा जनसागर चैत्यभूमिवर

babasaheb-ambedka
babasaheb-ambedka

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अभिवाद करण्यास लाखोंचा जनसागर चैत्यभूमिवर उसळला आहे.

सकाळपासूनच चैत्यभुमिवर नागरिकांनी गर्दी केली आहे. मंत्री शिक्षण विनोद तावडे, पशु दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार भाई जगताप, आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, काँग्रस प्रवक्ते राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जंयत पाटील, चित्रा वाघ, सचिन अहिर यांच्यासह मान्यवर नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

यावेळी मंत्री महादेव जानकर म्हणाले, बाबासाहेबांना फक्त दलितांचे नेते म्हणण्याऐवजी सर्वव्यापी बाबासाहेब असा उल्लेख करावा. केंद्र सरकर किंवा राज्य सरकार इंदू मिलचे जागेचा प्रश्न सोडवत जागतीक दर्जीचे स्मारक उभा करेल याचा मला विश्वास आहे. आम्ही बाबासीहेबांचे स्मारक उभारण्यास कटीबध्द असल्याचेही महादेव जानकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटिल म्हणाले, सरकार इंदु मिल बाबत फसवणूक करत आहे.5 एकरवर सीआरझेड लागू केल्याने स्मरकाचा शोभा निघुन जाईल. सरकारच्या मनात स्मारक बनवयची आहे का ही शंका आहे. इतर कोणत्या स्मारकाला सीआरझेड लागू करत नाही यालाच का केलाय जातोय. सरकारला 2019 पर्यन्त स्मारक लांबवायचा आहे म्हणून हे सार केल जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

माजी खासदार एकनाथ गायकवाड म्हणाले, आजचा दिवस हा आमच्यासाठी मोठा दिवस आहे. सरकारने इंदु मिलची जागा आणि आता काही भागात सीआरझेड लागू करत आहेत हे सरकर फसव असल्याची टीका करत गायकवाड यांनी सर्व जागा ही स्मारकासाठी दिली पाहिजे अशी मागणी केली.

एकनाथ गायकवाड यांनी सरकार संघाचा समरसता हा शब्द आमच्या वर लागू करत असल्याचा आरोपही ही केला. ते म्हणाले, आजचा दिवस हा समता दिन आहे पण आज केंद्र सरकारने समरसता दिन म्हणून जाहिर केला आहे. हे खुप वाइट असल्याचे सांगत गायकवाड यांनी सरकरचा निषेध केला.

काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा आजचा चागला दिवस आहे. 12 एकर जमीन दिल्या नंतर आता सरकार 5 एकर सीआरझेड लागू करत आहे हे चुकीच आहे. सरकारला समुद्र किनारी असलेले मोठे बगले दिसत नाहीत का
असा प्रश्न विचारत कांँग्रेस आता या विरोधात लढा देणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com